संरक्षण मंत्रालय
छावणीमधील मालमत्ता कर नोंदणीमध्ये ऑनलाइन बदल करण्याची तरतूद
Posted On:
26 MAY 2022 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2022
राहणीमान सुलभ करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून, छावणी भागात राहणारे 2.18 लाख मालमत्ता करदाते ई-छावणी पोर्टल (https://echhawani.gov.in) अंतर्गत मालमत्ता कर नोंदणीमध्ये बदलासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. मालमत्ता कराच्या नोंदीमध्ये बदल करण्यासाठी मालमत्ताधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह आणि लागू शुल्क भरण्यासाठी eChhavani पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज/कागदपत्रांमध्ये कोणतीही उणीव आढळून आल्यास, ती सुधारण्यासाठी नागरिकांकडे परत पाठवली जाईल. अन्यथा, मालमत्ता कर नोंदवहीमधील बदल नोंदवून मालमत्ता मालकाला ऑनलाइन प्रमाणपत्र दिले जाईल.
मालमत्ता कर नोंदणीमध्ये ऑनलाइन बदल करण्याच्या सुविधेमुळे मालमत्ता मालक आणि छावणी मंडळाचे अधिकारी यांच्यातील सन्मुखता कमी होऊन पारदर्शकता अधिक वाढेल. ही प्रक्रिया त्रास, विलंब टाळेल आणि अनुपालन कमी करेल ज्यामुळे छावणीमधील “जीवन सुलभतेला'' चालना मिळेल.
S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828576)
Visitor Counter : 202