भारतीय निवडणूक आयोग

महाराष्‍ट्र, बिहार, उत्तर प्रदेश विधानपरिषदेसाठी व्दैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Posted On: 25 MAY 2022 10:15PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार विधान परिषदेमधून 06.07.2022 ते 21.07.2022 या कालावधीत निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या व्दैवार्षिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आणि बिहार विधानपरिषदांच्या ३० सदस्यांचा कार्यकाळ संपुष्‍टात येत आहे. त्या जागा भरण्‍यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील सदस्य पुढीलप्रमाणे

क्र .

सदस्य

निवृत्ती दिनांक

  1.  

सदाशिव रामचंद्र खोत

 

 

 

 

07.07.2022

 

  1.  

सुजितसिंह मानसिंह ठाकूर

  1.  

प्रवीण यशवंत दरेकर

  1.  

सुभाष राजाराम देसाई

  1.  

रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर

  1.  

संजय पंडितराव दौंड

  1.  

विनायक तुकाराम मेटे

  1.  

प्रसाद मिनेश लाड

  1.  

दिवाकर नारायण रावते

  1.  

रामनिवास सत्यनारायण सिंह ( 02.01.2022 पासून रिक्त )

 

या निवडणुकीसाठी अधिसूचना दि. 2 जून, 2022 रोजी जारी करण्‍यात येणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्‍याची अंतिम तारीख 9 जून, 2022 पर्यंत आहे. अर्जांची छाननी 10 जून, 2022 रोजी होणार असून, 13 जून, 2022 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान 20 जून रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत होणाार असून त्याचदिवशी सायंकाळी 5.00 वाजता मतमोजणी होणार आहे.

S. No.

Events

Dates

  1.  

Issue of Notification

02nd June, 2022 (Thursday)

  1.  

Last Date of making nominations

09th June, 2022 (Thursday)

  1.  

Scrutiny of nominations

10th June, 2022 (Friday)

  1.  

Last date for withdrawal of candidatures

13th June, 2022 (Monday)

  1.  

Date of Poll

20th June, 2022 (Monday)

  1.  

Hours of Poll

09:00 am- 04:00 pm

  1.  

Counting of Votes

20th June, 2022 (Monday) at 05:00 pm

  1.  

Date before which election shall be completed

22nd June, 2022 (Wednesday)

 

आयोगाने कोविड 19बाबत जारी केलेल्या विस्तृत मार्गदर्शक सूचना 02.05.2022 पत्रकाच्या परिच्छेद 06मध्ये दिल्या असून त्या पुढील लिंक वर उपलब्ध आहेत. जिथे लागू असेल तिथे संपूर्ण प्रक्रियेत सर्व व्यक्तींनी त्याचे पालन करावे. https://eci.gov.in/files/file/14151-schedule-for-bye-election-in-3-assembly-constituencies-of-odisha-kerala-and-uttarakhand%E2%80%93-reg/

संबंधित राज्यांच्या मुख्‍य सचिवांनी या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्‍यासाठी आवश्‍यक त्या उपाय योजना करण्‍याविषयी निर्देश आयोगाने दिले आहेत.

निवडणुका आयोजित करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सध्याच्या सूचनांचे पालन केले जात आहे याची खात्री करण्यासाठी संबंधित मुख्य सचिवांना राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

***

S.Kakade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828367) Visitor Counter : 184


Read this release in: Hindi , English , Urdu