शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शिक्षण मंत्रालयाने नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021 (NAS) केला प्रकाशित

Posted On: 25 MAY 2022 9:47PM by PIB Mumbai

 

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने आज नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (NAS) 2021 अहवाल म्हणजेच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण  अहवाल प्रकाशित  केला.  या अहवालामध्‍ये  इयत्ता तिसरी , पाचवीआठवी आणि दहावीमधील मुलांच्या शिकण्याच्या क्षमतांचे सर्वसमावेशक मूल्यमापन  केले आहे.. या सर्वेक्षणातून  शालेय शिक्षण पद्धतीचे एकूण मूल्यमापन स्पष्‍ट होते.  याआधी अशाप्रकारे सर्वेक्षण  2017 मध्ये करण्‍यात आले होते.

संपूर्ण देशस्तरावर एनएएस 2021 चे  12.11.2021 रोजी आयोजन करण्यात आले होते.  यामध्‍ये  (अ) सरकारी शाळा (केंद्र सरकार आणि राज्य सरकार); (ब) सरकारी अनुदानित शाळा; आणि (क ) खाजगी विनाअनुदानित शाळा यांचा समावेश करण्‍यात आला होता. इयत्ता  3 आणि 5 साठी भाषा, गणित आणि ईव्हीएस  हे विषय समाविष्ट करण्‍यात आले होते. तर इयत्ता 8 वी साठी भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश होता.  इयत्ता 10 वी च्या सर्वेक्षणामध्‍ये  भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि इंग्रजी यांचा समावेश करण्‍यात आला होता.

ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील 720 जिल्ह्यांतील 1.18 लाख शाळांमधील सुमारे 34 लाख विद्यार्थ्यांनी एनएएस 2021 मध्ये भाग घेतला. यासंबंधीचे  राष्‍ट्रीय प्रगती  पुस्तक  जारी करण्यात आले आहे. यासंबंधीचा सर्व तपशील  nas.gov.in.  वर सार्वजनिक डोमेनवर  जाहीर करण्‍यात आला आहे.

***

S.Kakade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1828360) Visitor Counter : 2247


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia