संरक्षण मंत्रालय

संरक्षण सचिव आणि यूएई संरक्षण मंत्रालयाच्या  सैन्य विकास प्राधिकारणाचे प्रमुख यांच्यामध्‍ये संरक्षण सहकार्यवृद्धीच्या मार्गांवर चर्चा


भारत-यूएई संयुक्‍त संरक्षण सहकार्य समितीच्या 11व्या बैठकीचे नवी दिल्लीमध्‍ये आयोजन

Posted On: 25 MAY 2022 8:08PM by PIB Mumbai

 

यूएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयातले सैन्य विकास प्राधिकारणाचे प्रमुख मेजर जनरल स्टाफ हसन मोहम्मद सुलतान बानी हम्माद यांनी 25 मे 2022 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांची भेट घेतली.  उभय देशांमध्ये  संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर यावेळी त्यांनी चर्चा केली. काल, दि. 24 मे 2022 रोजी झालेल्या भारत- यूएई संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या (जेडीसीसी) 11व्या बैठकीचीही त्यांनी संरक्षण सचिवांना माहिती दिली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001VFTZ.jpg

संयुक्त सचिव (सशस्त्र सेना) दिनेश कुमार आणि यूएई संरक्षण मंत्रालयातील सैन्य विकास प्राधिकारणाचे प्रमुख, जेडीसीसी बैठकीचे सह-अध्यक्ष होते. या बैठकीदरम्यान, दोन्ही बाजूंनी संयुक्त सराव, तज्ज्ञांमधील विचारांचे आदानप्रदान, उद्योग सहकार्य आणि संशोधन आणि विकास क्षेत्रातील सहकार्यासह सैन्य-ते-सैन्यसहभागांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. संरक्षण उद्योगातील सहकार्य वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याचा आणि संयुक्त उपक्रमासाठी परस्पर हिताची क्षेत्रे तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान संयुक्त सरावांची व्याप्ती  वाढविण्यावरही चर्चा झाली.

जेडीसीसीची पुढील बैठक 2023 मध्ये परस्पर सोयीस्कर तारखांना यूएईमध्ये घेण्यावर सहमती झाली. जेडीसीसी ही द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या सर्व पैलूंचा सर्वसमावेशकतेने  पुनरावलोकन आणि मार्गदर्शन करण्यासाठी भारत आणि यूएईच्या संरक्षण मंत्रालयांमधील सर्वोच्च संस्था आहे.

 

यावेळी जनरल यांनी एकात्मिक संरक्षण कर्मचारी (पॉलिसी प्लॅनिंग आणि फोर्स डेव्हलपमेंट) उपप्रमुख लेफ्टनंट जनरल अतुल्य सोळंकी यांची भेट घेतली. यूएईच्या  शिष्टमंडळाने भारतीय संरक्षण उद्योगांशी देखील संवाद साधला आणि गाझियाबादच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला भेट दिली.

***

S.Kakade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828324) Visitor Counter : 154