PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 24 MAY 2022 8:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 24 मे 2022

  • 192.52 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 14,841
  • Active cases stand at 0.03%
  • Recovery Rate currently at 98.75%
  • 1,635 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,26,00,737
  • 1,675 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.41%)
  • Weekly Positivity Rate (0.49%)
  • 84.74 cr Total Tests conducted so far; 4,07,626 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCorona

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 192.52 (1,92,52,70,955) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,42,67,393 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.30 (3,30,30,574 ) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

सध्या भारतातील रुग्णसंख्या 14,841 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे.

गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,635  रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,26,00,737 झाली आहे.

गेल्या 24 तासात 1,675 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,07,626 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.74 (84,74,99, 852) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.49 % तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.41 % आहे.

इतर अपडेट्स :

 

 

 

S.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 



(Release ID: 1828035) Visitor Counter : 151


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri