नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
'नवीकरणीय उर्जा माध्यमातून हरित भारत’ या विषयावर पुणे येथे कार्यशाळा
महाराष्ट्रातल्या नवीकरणीय उर्जा प्रकल्पांसाठी ‘इरेडा’कडून 14,445 कोटी रूपयांचे कर्ज मंजूर; आणि 10,018 कोटी रूपये वितरित
उद्योग क्षेत्रातल्या दिग्गजांनी हरित उर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचे ‘इरेडा’च्या अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकांचे आवाहन
Posted On:
23 MAY 2022 4:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मे 2022
इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (आयआरईडीए-इरेडा) आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे ‘नवीकरणीय उर्जा माध्यमातून हरित भारत’ या विषयावर 20 मे 2022 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातल्या उदयोजकांनी आणि गुंतवणूकदारांनी नवीकरणीय उर्जा क्षेत्राकडे लक्ष देवून त्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन इरेडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी कार्यशाळेतल्या मुख्य भाषणामध्ये केले. नवीनकरणीय उर्जा प्रकल्प केवळ स्वच्छ उर्जा निर्माण करताहेत असे नाही तर, कार्बन उत्सर्जनही कमी होते. यामुळे जीवनाची गुणवत्ता सुधारणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2030 पर्यंत 500 गिगावाट जीवाश्म विरहीत उर्जा क्षमतेचे महत्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले आहे. आपल्या हरित उर्जेच्या क्षमतेचा वापर करून महाराष्ट्र या ध्येयपूर्तीसाठी महत्वपूर्ण योगदोन देऊ शकतो असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये नवीकरणीय उर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी इरेडा कटिबद्ध आहे यावर भर देवून प्रदीपकुमार दास यांनी इरेडाव्दारे दिलेल्या एकूण 1,20,946 कोटी रूपये कर्जापैकी महाराष्ट्रातल्या 422 नवीकरणीय उर्जा प्रकल्पांसाठी 14, 445 कोटी रूपये मंजूर केले आहेत, अशी माहिती दिली. कंपनीने वितरीत केलेल्या 79,446 कोटींपैकी महाराष्ट्रामध्ये एकूण 10,018 कोटींचे कर्ज वितरीत केले आहे. कंपनीने2021-22 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या 12 नवीकरणीय उर्जा प्रकल्पांसाठी 2,564 कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. तसेच यावर्षात 1362 कोटींचे कर्ज वितरीत केले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
नवीकरणीय उर्जा क्षेत्रांव्यतिरिक्त, इरेडाच्यावतीने नवीकरणीय उर्जा उत्पादनासाठी स्पर्धात्मक व्याजदरांवर वित्तपुरवठा करत आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल.
कार्यशाळेमध्ये एमसीसीएआयचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, ऊर्जा खर्चात कपात करण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जाद्वारे भारताला हरित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827635)
Visitor Counter : 274