माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज “कान नेक्स्ट’ स्टार्टअप प्रोत्साहन सत्रातल्या प्रतिनिधींना केले संबोधित
भारतीय चित्रपट उद्योग जगातील सर्वात मोठा अनेक संधी असलेला व्यवसाय : डॉ. मुरुगन
Posted On:
22 MAY 2022 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2022
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज कान नेक्स्ट स्टार्टअप प्रोत्साहन सत्राच्या प्रतिनिधींना संबोधित केले.
सुरुवातीला डॉ. मुरुगन यांनी दृकश्राव्य निर्मिती आणि चित्रपट उद्योग क्षेत्रातले नव-प्रतिभाशाली आणि स्टार्टअपना प्रमुख व्यासपीठ देणाऱ्या कान नेक्स्टच्या आयोजकांची प्रशंसा केली.
चित्रपट निर्मितीचे केंद्र म्हणून भारताचे महत्त्व यावर बोलताना ते म्हणाले, “दर वर्षी विवध भाषांमधील 2000 पेक्षा जास्त चित्रपट जिथे बनतात, तो भारत हा सृजनशील आणि प्रतिभाशाली चित्रपट उद्यमींची कर्मभूमी असलेला सर्वात मोठा चित्रपट निर्माता देश आहे. 1.3 अब्ज लोकसंख्येचा हा देश सर्वात मोठ्या आणि भरभराटीला येणाऱ्या चित्रपट बाजारपेठांपैकी एक आहे. भारत कथा आणि आशयप्रधान चित्रपट कर्मींचा देश असून उदयाला येणारे साधनसामुग्रीचे जागतिक केंद्र आहे. स्मार्ट फोनचा सर्वात मोठा निर्माता आणि उपभोक्ता असल्यामुळे OTT मंच आणि इंटरनेट आधारित अन्य माध्यमांद्वारे चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचत आहे आणि प्रत्येक प्रेक्षकाला चित्रपट सहज पाहता येत आहे असे ते म्हणाले. “तांत्रिक आणि साॅफ्टवेअर प्रतिभेच्या सर्वात मोठ्या स्त्रोतांपैकी एक असलेल्या भारतात आधुनिक चित्रपट उद्योगासाठी आवश्यक कौशल्य आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे.” असे ते म्हणाले.
“दृकश्राव्य माध्यमात तंत्रज्ञानाचा कलेशी संगम होतो. ब्लॉक चेन, डीप लर्निंग, AI आणि VR यासारखे नव-तंत्रज्ञान चित्रपटांमध्ये प्रवेश करत असून या माध्यमाचा दर्जा उंचावत आहे. संहितेचे भाषांतर, सब टायटल यामुळे भाषेचा अडथळा दूर होत आहे.”, असं मुरुगन यांनी उपस्थितांना सांगितले.
अॅनिमेशन, व्हर्चूअल रिअलिटी, गेमिंग, एक्स्टेंडेड रिअलिटी तरुण स्टार्टअपना आपल्या नव-कल्पनांनाचा अविष्कार सादर करण्याची संधी देत आहेत, असे मत मुरूगन यांनी व्यक्त केले.
कान महोत्सवात भारतातील 5 स्टार्टअपने केलेल्या प्रदर्शनाबद्दल समाधान व्यक्त करताना ते म्हणाले, “त्यांच्या कल्पना निर्माते आणि उद्योजकांना आकर्षित करतील आणि त्यांच्या निर्मितीला मोठे व्यासपीठ उपलब्ध करतील अशी मी अशा करतो. त्यांच्या ‘लोकल ते ग्लोबल’ प्रगतीचा मला आनंद आहे.”
कान नेक्स्ट ही मनोरंजन क्षेत्राच्या भविष्याचा वेध घेणारी कार्यकारी परिषद आणि व्यापार विकास मंच आहे. जागतिक दर्जाच्या सृजनाला व्यापार आणि नव तंत्रज्ञानाबरोबर जोडून भागीदारीच्या माध्यमातून व्यापाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा अनोखा मेळावा आहे.
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827466)
Visitor Counter : 175