पंतप्रधान कार्यालय

मध्य प्रदेश स्टार्टअप धोरणाच्या शुभारंभ प्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 13 MAY 2022 10:38PM by PIB Mumbai

नमस्कार!

 

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान,मध्य प्रदेश सरकारचे सर्व मंत्रीगण, खासदार, आमदार , स्टार्ट अप्स क्षेत्रातील माझे सहकारी, स्त्री आणि पुरुषहो !

तुम्ही सर्वांनी पाहिले असेल कदाचित, मी मध्यप्रदेशच्या युवा प्रतिभावंतांशी, स्टार्टअप्सशी संबंधित काही युवकांशी चर्चा करत होतो आणि मला जाणवत होते, तुम्हालाही जाणवत असेल, आणि एक गोष्ट नक्की आहे की जेव्हा मनात उत्साह असेल,नवीन उमेद असेल, नाविन्यपूर्ण काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असेल तेव्हा त्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो आणि उमंग याने तर आज अशा प्रकारचे भाषण देखील दिले. तुम्हा सर्वांशी बोलण्याची मला आज संधी मिळाली आणि ज्यांनी हे ऐकले असेल, ते अगदी विश्वासाने सांगू शकतील की आज देशात सक्रिय स्टार्टअप धोरणही आहे आणि मेहनती स्टार्टअप नेतृत्व देखील आहे. म्हणूनच , देश एका नव्या उर्जेसह विकासाला गती देत आहे. आज मध्य प्रदेशमध्ये स्टार्ट अप पोर्टल आणि i-Hub इंदूरचा शुभारंभ झाला आहे. मध्य प्रदेशच्या स्टार्ट अप धोरण अंतर्गत स्टार्ट अप्स आणि इंक्यूबेटर्सना वित्तीय सहाय्य देखील देण्यात आले आहे. या प्रयत्नांसाठी आणि या आयोजनासाठी मध्य प्रदेश सरकारचे , देशाच्या स्टार्ट अप परिसंस्थेचे आणि तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

 

मित्रांनो ,

तुम्हाला आठवत असेल, 2014 मध्ये जेव्हा आमचे सरकार आले होते, तेव्हा देशात 300-400 च्या आस-पास स्टार्ट-अप्स असायचे तरीही स्टार्ट-अप शब्द देखील ऐकू यायचा नाही , त्याबाबत काही चर्चा देखील व्हायची नाही. मात्र आज आठ वर्षांच्या छोट्या कालावधीत भारतात स्टार्ट अप्सचे जगच बदलून गेले आहे. आज आपल्या देशात सुमारे 70 हजार मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. आज भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे. आपण जगातील सर्वात मोठ्या यूनिकॉर्न हब्स मध्ये देखील एक ताकद म्हणून उदयाला येत आहोत. आज सरासरी 8 किंवा 10 दिवसांच्या आत भारतात एक स्टार्ट अप यूनिकॉर्न बनतो, यूनिकॉर्न मध्ये बदलत आहे. आता तुम्ही कल्पना करू शकता की शून्यापासून सुरु करून , एखादा स्टार्टअप युनिकॉर्न बनतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की एवढ्या कमी वेळेत सुमारे 7 हजार कोटी रुपयांच्या भांडवलापर्यंत पोहचणे , तेव्हा एक यूनिकॉर्न बनतो, आणि आज 8–10 दिवसात एक नवीन यूनिकॉर्न या देशात आपले युवक तयार करत आहेत.

 

मित्रांनो ,

हे भारताच्या युवकांचे सामर्थ्य आहे, यशाची नवी शिखरे गाठण्याच्या इच्छाशक्तीचे उदाहरण आहे. आणि मी अर्थ जगतातील धोरणांचा अभ्यास करणाऱ्या जाणकारांना एक गोष्ट नमूद करायला सांगेन. भारतात जेवढे मोठे आपले स्टार्टअप्सचे आकारमान आहे, तेवढेच त्याचे वैविध्य देखील आहे. हे स्टार्टअप्स केवळ एक राज्य किंवा दोन -चार मेट्रो शहरांपुरते सीमित नाही. हे स्टार्टअप्स भारताच्या अनेक राज्यांमध्ये , भारताच्या अनेक छोट्या-छोट्या शहरांमध्ये पसरलेले आहेत. एवढेच नाही, एक वरकरणी जर मी हिशेब मांडला तर 50 हून अधिक विचिध प्रकारच्या उद्योगांशी स्टार्ट -अप्स निगडित आहेत. देशातील प्रत्येक राज्य आणि साडेसहाशे पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये त्याचे अस्तित्व आहे. सुमारे 50 टक्के स्टार्टअप्स तर असे आहेत , जे द्वितीय किंवा तृतीय श्रेणीच्या शहरात येतात. अनेकदा काही लोकांचा गैरसमज होतो की स्टार्ट अप म्हणजे संगणकाशी संबंधित युवकांचा एखादा खेळ सुरु आहे , काही तरी व्यवसाय सुरु आहे. हा भ्रम आहे, वास्तव तर हे आहे की स्टार्ट अपची व्याप्ती आणि विस्तार खूप मोठा आहे. स्टार्ट अप्स आपल्याला कठीण आव्हानावर सोपा तोडगा देते. आणि आपण पाहत आहोत की उद्याचे स्टार्स अप्स, आजचे मल्टीनेशनल्स बनत आहेत . मला आनंद आहे की आज कृषी क्षेत्रात किरकोळ व्यापार क्षेत्रात , आरोग्य क्षेत्रात नवनवीन स्टार्ट अप्स उदयाला येत आहेत.

 

मित्रांनो,

आज जेव्हा आपण जगाला भारताच्या स्टार्ट अप परिसंस्थेची प्रशंसा करताना ऐकतो, तेव्हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. मात्र मित्रांनो , एक प्रश्न देखील पडतो. 8 वर्षांपूर्वीपर्यंत जो स्टार्ट अप शब्द काही तांत्रिक जगतातच चर्चेचा भाग होता, तो आज सामान्य भारतीय युवकाचे स्वप्न पूर्ण करण्याचे एक सशक्त माध्यम,त्यांच्या दैनंदिन चर्चेचा भाग कसा बनला? हा एवढा मोठा बदल अचानक कसा झाला ? अचानक नाही झाला एका विचारपूर्वक आखलेल्या धोरणाअंतर्गत स्पष्ट लक्ष्य, निर्धारित दिशा यांचा हा परिणाम आहे आणि मला वाटते की आज जेव्हा मी स्टॉर्टअप विश्वात कार्यरत युवकांना भेटत आहे आणि इंदूर सारखी भूमी माझ्यासमोर आहे तेव्हा तुम्हाला आज काही गोष्टी सांगाव्याशा वाटत आहेत. आज ज्याला स्टार्ट अप क्रांति म्हटले जाते , ती कशी आकाराला आली हे प्रत्येक युवकाने जाणून घेणे खूप आवश्यक आहे. आणि ही एक प्रेरणा देखील आहे. स्वातंत्र्याच्या अमृत काळासाठी हे खूप मोठे प्रोत्साहन देखील आहे.

 

मित्रांनो ,

भारतात नेहमीच नव्या कल्पनेतून समस्यांवर उपाय शोधण्याचा नेहमीच प्रयत्न झाला आहे. आपल्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीच्या काळात आपण याचा चांगलाच अनुभव घेतला आहे. मात्र दुर्दैवाने जेवढे प्रोत्साहन, जेवढे समर्थन,त्या काळात आपल्या युवकांना मिळायला हवे होते तेवढे मिळू शकले नाही. माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा सुयोग्य वापर करण्याची, एक दिशा देण्याची गरज होती. मात्र ते होऊ शकले नाही. आपण पाहिले की ते संपूर्ण दशक मोठमोठे घोटाळे, धोरण लकवा आणि घराणेशाहीमुळे देशातील एका पिढीची स्वप्ने उध्वस्त झाली. आपल्या युवकांकडे कल्पना होत्या, अभिनव संशोधन करण्याची इच्छा होती मात्र सगळे काही पूर्वीच्या सरकारची धोरणे आणि एक प्रकारे धोरणांच्या अभावी रखडले.

 

मित्रांनो ,

2014 नंतर आम्ही युवकांच्या या सामर्थ्याला , नवसंशोधनाच्या भावनेला पुनरुज्जीवित केले. आपण भारताच्या युवकांच्या सामर्थ्यावर विश्वास दाखवला. स्टार्ट अप क्षेत्राला चालना देण्यासाठी कल्पना ते नाविन्यपूर्णता ते उद्योग असा संपूर्ण आराखडा तयार केला आणि तीन गोष्टींवर भर दिला.

एक - आयडिया , इनोव्हेट, इन्क्युबेट आणि इंडस्ट्री , यांच्याशी निगडित संस्थांची पायाभूत निर्मिती

दोन - सरकारी प्रक्रियांचे सुलभीकरण

आणि तीन - नाविन्यपूर्ण संशोधनासाठी मानसिकतेत बदल , नवीन परिसंस्थेची निर्मिती

 

मित्रांनो ,

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही वेगवेगळ्या आघाड्यांवर एकत्र काम करायला सुरुवात केली. यापैकीच एक होते हैकेथॉन (Hackathons). सात-आठ वर्षांपूर्वी जेव्हा देशात हैकेथॉनला सुरुवात झाली तेव्हा कुणालाही वाटले नव्हते कि यातून स्टार्ट अप्ससाठी मजबूत पायाभरणी होईल. आम्ही देशातील युवकांना आव्हान दिले , युवकांनी आव्हान स्वीकारले आणि त्यावर उपाय देखील सुचवले. देशातील लाखो युवकांना या हैकेथॉनमुळे जगण्याचा उद्देश मिळाला , जबाबदारीची भावना अधिक वृद्धिंगत झाली. यामुळे त्यांच्यात विश्वास निर्माण झाला की ज्या दैनंदिन समस्या देशाला भेडसावत आहेत, त्या सोडवण्यात ते आपले योगदान देऊ शकतात. या भावनेने स्टार्ट-अप्ससाठी एक प्रकारे लाँच पॅडचे काम केले. तुम्हाला माहीतच आहे , केवळ सरकारच्या स्मार्ट इंडिया हैकेथॉन मध्ये गेल्या काही वर्षात सुमारे 15 लाख प्रतिभावान युवक सहभागी झाले.मला आठवतंय की अशाच हैकेथॉन्समध्ये , कारण मलाही खूप छान वाटायचे, नवनवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या , तेव्हा मी 2-2 दिवस युवकांच्या या हैकेथानवर बारीक लक्ष ठेवून होतो , रात्री 12 वाजता, 1 वाजता , 2 वाजता त्यांच्याबरोबर गप्पा मारत होतो. त्यांचा उत्साह पाहत होतो.

ते काय करतात, समस्यांशी कशी झुंज घेतात, यश मिळाल्यावर किती आनंदित होतात या सर्व गोष्टी मी बघत होतो, मला त्या जाणवत होत्या आणि मला आनंद आहे की आज सुद्धा देशातील कोणत्या ना कोणत्या भागात दररोज कुठली ना कुठली हॅकॅथॉन सुरु आहे होत आहे. म्हणजेच स्टार्ट अप निर्माणाच्या पायाभूत प्रक्रियेवर देश सतत काम करत आहे.
 
मित्रहो,
सात वर्षांपूर्वी स्टार्टअप इंडिया मोहीम हे उद्योगांसाठीच्या संकल्पना म्हणजेच आयडिया टू इंडस्ट्रीला एक संस्था म्हणून उद्याला आणण्याकडे टाकलेले एक मोठे पाऊल होते. आज या संकल्पनेची कास धरून त्या संकल्पनांनाच उद्योगात बदलण्याचे एक मोठे माध्यम तयार झाले आहे. त्यानंतरच्या वर्षात आम्ही देशात संशोधनाची मानसिकता विकसित करण्यासाठी अटल इनोवेशन मिशन सुरू केले. त्याअंतर्गत शाळांमध्ये अटल टिकरिंग लॅब पासून विद्यापीठांमधील इन्क्युबेशन सेंटर आणि हॅकेथॉन सारख्या भरपूर भव्य इकोसिस्टीम तयार केल्या जात आहेत. आज देशभरातील 10 हजारांपेक्षा अधिक शाळांमध्ये इन अटल टिकरिंग लॅब सुरू आहेत. यामध्ये 75 लाखांहून अधिक मुले आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेत आहेत. संशोधनातील मुळाक्षरे शिकत आहेत. देशभरात तयार होत असलेल्या या अटल टिकरिंग लॅब एक प्रकारे स्टार्ट अप नर्सरी असल्यासारखी काम करत आहे. जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयात जाईल तेव्हा त्याच्या जवळ ज्या नव्या संकल्पना असतील त्यावर काम करण्यासाठी देशभरात 700 पेक्षा अधिक अटल इन्क्युबेशन केंद्रे तयार झाली आहेत. देशात जे नवे शिक्षण धोरण लागू झाले आहे ते सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांच्या संशोधक मेंदूला अधिक काम करण्यासाठी मदत करेल.
 
मित्रहो,
इन्क्युबेशन सोबतच स्टार्टअपसाठी निधी मिळणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामध्ये त्यांना सरकारच्या ठाम धोरणांमुळे मदत झाली. सरकारने आपल्या बाजूने एक ‘निधीसाठीचा निधी’ तर उभारला आहेच पण खासगी क्षेत्राशी जोडून घेण्यासाठी वेगवेगळी व्यासपीठे ही तयार केली. या पावलांमुळेच आज हजारो कोटी रुपयांची खाजगी गुंतवणूक स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये हळूहळू येत आहे आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.
 
मित्रहो,
गेल्यावर्षी करांमध्ये सवलत देत देण्यापासून ते प्रोत्साहन भत्ता देईपर्यंत देशात अनेक सुधारणा लागोपाठ केल्या गेल्या आहेत. अंतराळ क्षेत्रात मॅपिंग, ड्रोन इत्यादी तंत्रज्ञानाची उंची गाठणाऱ्या अनेक क्षेत्रांमध्ये ज्या प्रकारे सुधारणा केल्या गेल्या आहेत त्यानुसार स्टार्टअपसाठी नवीन क्षेत्राचे दरवाजे उघडले आहेत.
 
मित्रहो,
आम्ही स्टार्ट अपसंदर्भातील अजून एका आवश्यकतेला प्राधान्य दिले. स्टार्ट अप आकाराला आली. त्यांच्या सेवा, त्यांची उत्पादने सहजपणे बाजारात यावी सरकारच्या रूपात एक मोठा खरेदीदार त्यांना मिळावा यासाठी भारत सरकारकडून GeM पोर्टल वर विशेष व्यवस्था केली गेली. आज GeM पोर्टलवर तेरा हजाराहून अधिक स्टार्ट अप्सची नोंदणी झाली आहे आणि या पोर्टल वर स्टार्टअप कंपन्यांनी साडेसहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे ऐकल्यावर आपल्यालाही आनंद होईल.
 
मित्रहो
 

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827379) Visitor Counter : 123