शिक्षण मंत्रालय
21 व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आम्ही आमच्या मनुष्यबळाला सज्ज करीत आहोत – धर्मेंद्र प्रधान
Posted On:
21 MAY 2022 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मे 2022
आय.एफ.टी.डी.ओ. अर्थात प्रशिक्षण व विकास संस्थांच्या आंतरराष्ट्रीय महासंघातर्फे नवी दिल्ली इथे आयोजित 49व्या आय.एफ.टी.डी.ओ. जागतिक परिषद आणि प्रदर्शनात केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास व नवोद्योजक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समारोपाचे भाषण केले. “चपळ कार्यपद्धतीसाठी धोरण : नवयुगाकडे जाणारे मार्ग” ही यंदाच्या या परिषद व प्रदर्शनाची संकल्पना होती.
समाज आणि अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानाची भूमिका ही फायदेशीर आणि तोट्याचीही ठरू शकते, असा मुद्दा प्रधान यांनी आपल्या भाषणात मांडला. झपाट्याने बदलत्या जगात 21 व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या मनुष्यबळाला आपण समग्र कौशल्य धोरणाच्या आधारे सज्ज केले पाहिजे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व क्षेत्रांमध्ये क्षमता बांधणीवर भर दिला जात आहे, असे प्रधान यांनी सांगितले. क्षमता बांधणी व विविध विभागांमध्ये समन्वयाकरता उत्तमोत्तम पर्यायांच्या शोधात असलेल्या भारतीय क्षमता बांधणी आयोगाची भूमिका महत्त्वाची असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि शिक्षण व कौशल्य यांच्यात समन्वय साधण्यावर या धोरणात असलेला भर, धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या भाषणात विषद केला. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने वर्षे 3 ते 23 वयोगटातील विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षण व्यवस्थेत सामावून घेतले आहे. मात्र, औपचारिक शिक्षण व्यवस्थेचा भाग नसलेल्यांना सामावून घेणाऱ्या नवीन कल्पना आणि त्यांचा कौशल्य विकास साधण्यासाठी व त्यात त्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी नवनवीन पद्धतींच्या शोधात राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
* * *
N.Chitale/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827197)
Visitor Counter : 227