रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

श्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून वंदे भारत रेल्वेगाड्यांच्या उत्पादनाची पाहणी


इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई येथे 12 हजाराव्या एलएचबी डब्याला दाखवले हिरवे निशाण

आयआयटी मद्रासच्या "हायपरलूप चॅम्पियन्सचे" केले अभिनंदन

Posted On: 20 MAY 2022 7:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2022

 

केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव,यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई येथे, स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या उत्पादनाची पाहणी केली.  आपल्या दौऱ्यात मंत्री महोदयांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या कार्यासाठी प्रेरित केले.

चेन्नईच्या भेटीदरम्यान, श्री अश्विनी वैष्णव यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे तयार केलेल्या बारा हजाराव्या एलएचबी डब्याला हिरवे निशाण दाखवून रवाना केले.

एलएचबी कोच हे ऍन्टी- टेलिस्कोपिक, सुरक्षित, वजनाला हलके, अधिक आरामदायी असून त्यात धक्के बसत नाहीत.इंटिग्रल कोच फॅक्टरी मधील पारंपरिक डबे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून टप्प्याटप्प्याने बदलले जात असून त्याजागी एलएचबी डबे बसवले जात आहेत.

आपल्या भेटीदरम्यान, रेल्वे मंत्री श्री वैष्णव यांनी स्केलेबल हायपरलूप तंत्रज्ञान विकसित करून भारतातील गतीशीलतेचे (मोबिलिटीचे) भविष्य बदलण्यासाठी कटिबद्ध असलेल्या आयआयटी मद्रासमधील ध्येयनिष्ठ विद्यार्थ्यांच्या "आविष्कार हायपरलूप" टीमची प्रशंसा केली.

हायपरलूप तंत्रज्ञान

हायपरलूप हा दळणवळणाचा एक नाविन्यपूर्ण प्रकार आहे,जो पारंपरिक दळणवळणाच्या संकल्पनांना पूर्णपणे बाजूला सारतो आणि वेग आणि आराम ही दोन्ही उद्दिष्टे कार्बन उत्सर्जनाविना साध्य करतो. किमान कार्बन फूटप्रिंटसह शाश्वत, जलद आणि भविष्यात जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हा एक उत्तम वाहतूक पर्याय आहे.  शहरांदरम्यान बांधलेल्या पोकळ नलिकांवाटे(व्हॅक्यूम ट्यूबमध्ये) ध्वनीच्या गतीच्या(सोनिक) वेगाने प्रवास करण्याच्या संकल्पनेवर हायपरलूप आधारित आहे. हे वाहतुकीचे साधन म्हणजे व्हॅक्यूम ट्यूबमधील मॅग्लेव्ह तंत्रज्ञानावर आधारित आहे.

भारतीय रेल्वेने बुलेट ट्रेनपेक्षा जास्त वेगाने प्रवास करणारी हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित स्वदेशी वाहतूक प्रणाली विकसित करण्यासाठी आयआयटी मद्रासचे सहकार्य घेतले आहे. तिचा परीचालन खर्च खूपच कमी आहे. या प्रकल्पासाठी आयआयटी मद्रासला भारतीय रेल्वे 8.34 कोटी रुपयांच्या निधीची आर्थिक मदत करणार आहे.

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1827042) Visitor Counter : 154


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil