गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या मदत आयुक्त आणि सचिवांच्या वार्षिक परिषदेला सुरूवात


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नैऋत्य मोसमी हंगामापूर्वी चांगली तयारी करण्याचे केंद्रीय गृह सचिवांचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 18 MAY 2022 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मे 2022

 

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या मदत आयुक्त आणि सचिवांच्या वार्षिक परिषदेचे उद्‌घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या हस्ते करण्यात आले. येत्या नैऋत्य मोसमी हंगामात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही संभाव्य नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ही दोन दिवसीय परिषद आयोजित केली जात आहे. कोविड-19 महामारीमुळे ही परिषद दोन वर्षांच्या अवकाशानंतर, यावर्षी प्रथमच प्रतिनिधींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आयोजित केली जात आहे.

पूर, चक्रीवादळे, भूस्खलने यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान कमीतकमी करण्याच्या दृष्टीने, केंद्र आणि राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांनी अधिक चांगल्या प्रकारे सज्ज राहावे असे केंद्रीय गृह सचिवांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले. वर्षभर 24x7 सज्जता सुनिश्चित करण्यासाठी क्षमता आणि प्रतिसाद प्रतिक्षेप वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, दीर्घकालीन पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या तसेच केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर भविष्यातील पिढ्यांसाठीही आपत्ती रोखण्याच्या दूरदृष्टीचा  उल्लेख त्यांनी यावेळी केला.

गेल्या अनेक वर्षांपासूनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नैसर्गिक आपत्तींचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कमी करण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यशस्वी झाली आहे. असे निरीक्षण केंद्रीय गृह सचिवांनी नोंदवले,

राज्यांनी आपापल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य आपत्ती प्रतिसाद दले (SDRF), अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षण दले यांची क्षमता वाढवाव्या असे आवाहन त्यांनी केले. कारण ही सर्व दले आपत्तीच्या वेळी प्रथम प्रतिसाद देतात. शहर आणि जिल्हा स्तरावर क्षमता निर्माण करण्यावर आणि लोकसहभागाच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

केंद्रीय गृहसचिव म्हणाले की, गेल्या काही  वर्षांत पुराबरोबरच, चक्रीवादळे, जंगलातील वणवे, उष्णतेच्या लाटांमुळे निर्माण होणारी परिस्थिती आणि विजांचा आघात अशा प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. प्रभावी आपत्ती जोखीम व्यवस्थापनाची गुरुकिल्ली म्हणजे संस्थांमध्ये समन्वय आणि प्रभावी समन्वय निर्माण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. स्थानिक तसेच जिल्हा आणि राज्यस्तरावर कृती आराखडा तयार करून याची निश्चिती करता येईल असे ते म्हणाले.

या परिषदेदरम्यान, विविध राज्ये त्यांची आपत्ती व्यवस्थापनासाठीची सज्जता, त्याबाबतीतले अनुभव आणि गेल्या अनेक वर्षांत विविध आपत्ती हाताळण्यासाठी त्यांनी विकसित केलेल्या सर्वोत्तम कार्यपद्धतींसंबंधीची मांडणी सादर करतील.

 

S.Kane/S.Auti/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1826517) आगंतुक पटल : 267
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Odia , Telugu