वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याअंतर्गत सुमारे 400 सर्वसमावेशक जीआयएस आधारित नकाशे यापूर्वीच तयार - पियूष गोयल

Posted On: 18 MAY 2022 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मे 2022
 

 

पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याअंतर्गत सुमारे  400 सर्वसमावेशक जीआयएस  आधारित नकाशे यापूर्वीच तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आज दिली. क्रांतिकारी पीएम गतिशक्ती उपक्रमामुळे देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठीच्या पूर्वनियोजनासंदर्भातील समस्येचे निराकरण करण्यास आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी सुरक्षित, शाश्वत, प्रमाणयोग्य आणि सहयोगी दृष्टिकोन तयार करण्याच्या दृष्टीने मदत होईल, यावर मंत्र्यांनी भर दिला.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या मंत्रीस्तरीय सत्रात त्यांनी आज  'सहयोगी नियमांवरील चर्चासत्र : नियामक तंत्रज्ञान (रेग टेक) आणि तंत्रज्ञान मंचाचा वापर करून पायाभूत सुविधांची सह-निर्मिती आणि सामायिकरण (पीएम गतिशक्तीशी संलग्न ) आणि आंतरराष्ट्रीय नियामकांच्या  'सहयोगी नियम' बाबत  गोलमेज परिषद '' या विषयावर मुख्य भाषण केले.

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहे) साजरा करत असताना  देशाच्या सेवेची   25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल मंत्र्यांनी  भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अभिनंदन केले. डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारताचा पाया तयार करेल असे  त्यांनी सांगितले.

जगभरातील आरोग्य पायाभूत सुविधा आणि इतर सहाय्यक प्रणालींमध्ये जलद आणि सुलभ प्रवेश करून डिजिटल कनेक्टिव्हिटीने कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल मंत्र्यांनी  भाषणात बोलताना सांगितले.महामारीच्या काळात ज्या वेगाने शिक्षण ऑनलाइन झाले आणि शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वळले त्याबद्दल त्यांनी त्यांची प्रशंसा केली.
 
सरकारने  व्याप्ती , सुधारणा, नियमन, प्रतिसाद आणि क्रांती या पंचामृताने दूरसंचार क्षेत्राला  गेल्या आठ वर्षांत नवी ऊर्जा दिली आहे, असे दूरसंचार आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने केलेल्या प्रचंड प्रगतीचा संदर्भ देताना   गोयल यांनी सांगितले.


S.Kane/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1826503) Visitor Counter : 200


Read this release in: English , Urdu , Hindi