पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी हवामान बदलाविषयी ब्रिक्स उच्च स्तरीय बैठकीला केले संबोधित 

Posted On: 14 MAY 2022 4:43PM by PIB Mumbai

 

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी हवामान बदलाविषयी ब्रिक्स उच्च स्तरीय बैठकीमध्ये दुरदृष्य प्रणालीद्वारे भाग घेतला. 13 मे, 2022 रोजी झालेल्या या बैठकीत बोलताना भूपेंद्र यादव म्हणाले, हवामान बदलाविषयी एकत्रित येवून चर्चा करण्यासाठी, कार्बन उत्सर्जन कमी करणेअनुकूल परिवर्तन  आणि विकास साध्य करण्यासाठी शाश्वत पुनर्प्राप्तीचे धोरण यासाठी मंचाची समर्पकता  त्यांनी अधोरेखित केली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0010OYE.jpg

चीनचे पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण मंत्री  हुआंग रूनक्यू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ब्राझिल, रशिया, भारत आणि दक्षिण अफ्रिका या बिक्समधील देशांच्या पर्यावरण खात्यांचे मंत्री उपस्थित होते.

केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये वस्तूंचा सजगतेने वापर करणे आणि कचरा कमी करणे यावर आधारित शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासह  हवामान बदलासंबंधी भारताची वचनबद्धता अधोरेखित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत आज नवीकरणीय ऊर्जा, शाश्वत अधिवास, अतिरिक्त जंगले आणि वृक्ष आच्छादनाच्या माध्यमातून कार्बन सिंकची निर्मिती, शाश्वत वाहतूक, ई-गतिशीलता, हवामान वचनबद्धतेसाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणे यासाठी अनेक ठोस पावले सरकार उचलत आहे, हे सांगताना त्यांनी विविध उदाहरणे दिली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002OCVY.jpg

भारताने हरितगृह वायू उत्सर्जन आणि  आर्थिक विकास परस्परापासून विलग करणे कसे जारी  ठेवले आहे, याचा उल्लेख यादव यांनी केला.तसेच विकसनशील देशांकडून हवामानविषयक महत्वाकांक्षी निर्णयांची अंमलबजावणी ही  यूएनएफसीसीसी आणि पॅरिस करारानुसार अनिवार्य केलेल्या हवामान विषयक बाबींसाठी पुरेसे वित्तीय पाठबळ, तंत्रज्ञान हस्तांतरण,अंमलबजावणीसाठी सहाय्य यावर अवलंबून आहे, असे सांगितले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003S17B.jpg

ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांनी हवामान बदलावरील सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि सहयोगाची व्याप्ती अधिक वाढवून ती सखोल करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. यापुढे देशांनी पर्यावरण आणि हवामान बदलाच्या क्षेत्रामध्ये धोरणात्मक देवाण-घेवाण आणि सहकार्य करण्याचे मान्य केले. या प्रसंगी एक संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले.

***

S.Tupe/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825360) Visitor Counter : 155