गृह मंत्रालय

संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक दिवंगत महामहिम शेख खलिफा बिन झायेद अल नह्यान यांच्या सन्मानार्थ उद्या एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

Posted On: 13 MAY 2022 9:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2022

 

संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती  आणि अबू धाबीचे शासक महामहीम  शेख खलिफा बिन झायेद अल नह्यान  यांचे निधन झाले आहे. त्यांच्या सन्मानार्थ, भारत सरकारने उद्या संपूर्ण देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात ज्या इमारतींवर राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकवला जातो त्या सर्व इमारतींवर उद्या राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही अधिकृत मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत .

 

S.Patil/ S.Kane/ P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825229) Visitor Counter : 231


Read this release in: Hindi , English , Urdu