अर्थ मंत्रालय
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक संकुलातून आयात केलेल्या त्रिकोणी वॉल्व्हमध्ये लपवून ठेवलेले 61.5 किलो सोने महसूल गुप्तचर संचालनालयाने केले जप्त
Posted On:
12 MAY 2022 9:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2022
"गोल्डन टॅप" हे सांकेतिक नाव असलेल्या गुप्तपणे केलेल्या गुप्तचर ऑपरेशनअंतर्गत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकार्यांनी 11 मे 2022 रोजी ,लपवून सोन्याची तस्करी केली जात असल्याच्या संशयावरून, दिल्ली हवाई मालवाहतूक संकुलामध्ये, विमानमार्गे आयात मालाची खेप रोखली. या मालाच्या खेपेमध्ये त्रिकोणी व्हॉल्व्ह असल्याचे घोषित करण्यात आले होते , या मालाची खेप चीनच्या ग्वांगझू येथून जपान एअरलाइन्सच्या विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली होती.
