संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांसाठी वाढीव निवासी घरे व्यवस्था - 2022 ला मंजुरी दिली
Posted On:
12 MAY 2022 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2022
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 12 मे 2022 रोजी संरक्षण सेवांसाठी सुधारित निवास व्यवस्था 2022 (SoA) ला मंजुरी दिली. यामुळे भविष्यातील प्रकल्पांमध्ये समकालीन वैशिष्ट्ये आणि सशस्त्र दलातील जवानांसाठी उत्तम राहणीमान सुनिश्चित होईल.
निवासी व्यवस्था - 2022 च्या अंमलबजावणीमुळे समकालीन गरजांशी सुसंगत बांधकाम सुविधा/पायाभूत सुविधा आणि वैशिष्ट्यांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. बहुमजली बांधकामाचा वापर करून संरक्षण जमिनीचा कमाल वापर आणि सामायिक सुविधा एकत्र करण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे संरक्षण कर्मचार्यांसाठी कामाच्या ठिकाणी आणि घरी उत्तम सुविधा सुनिश्चित होतील. दिव्यांगांसाठी सर्व इमारतींमध्ये सुविधा उपलब्ध केल्या आहेत आणि सर्व वैशिष्ट्यांमध्ये लैंगिक समानता असेल हे सुनिश्चित केले आहे.
निवास व्यवस्था (SoA) संरक्षण सेवांसाठी परिचालन , क्रियाशील , प्रशिक्षण, प्रशासकीय, निवासी आणि मनोरंजन सुविधांसाठी बांधकाम सुविधांना मान्यता यावर भर देते. तिन्ही संरक्षण सेवा आणि भारतीय तटरक्षक दलासाठी हे लागू आहे. यापूर्वीच्या निवासी व्यवस्थेला ऑक्टोबर 2009 मध्ये सरकारने मंजुरी दिली होती. नवीन घरे , तंत्रज्ञान संबंधी सुविधा आणि उपकरणे , परिचालन सज्जता , वाढते धोके , समकालीन उद्योग मानकांसह शाश्वत विकासाची संकल्पना आणि सुधारित राहणीमानासाठी वापरकर्त्यांच्या वाढीव आकांक्षांमुळे 2009 च्या निवासी व्यवस्थेत सुधारणा आवश्यक होती.
निवासी व्यवस्थेतील सुधारणेमुळे पायाभूत सुविधांचा विकास होईल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल ,अधिका-यांना अधिक लवचिकता मिळेल आणि वापरकर्त्यांच्या आकांक्षा पूर्ण होतील. सुधारित व्यवस्था सरकारची दूरदृष्टी आणि स्वच्छ भारत, सुगम्य भारत, डिजिटल इंडिया, ग्रीन बिल्डिंग्स, शाश्वत विकास, नवीकरणीय ऊर्जा, कार्बन फूटप्रिंट कमी करणे इत्यादी कार्यक्रमांना सुसंगत असतील.
मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसेस (MES) ही एक प्रमुख बांधकाम संस्था आहे आणि भारतीय सैन्याच्या कोअर ऑफ इंजिनिर्सच्या स्तंभांपैकी एक आहे जी सशस्त्र दलांना आणि संरक्षण मंत्रालयाच्या (MoD) संबंधित संस्थांना अभियांत्रिकी सहाय्य पुरवते. एमईएस लष्करी स्थानके/छावणीसाठी विविध बांधकाम उपक्रम राबवते , यात निवासी आणि कार्यालयीन इमारती, रुग्णालये, रस्ते, धावपट्टी आणि सीमावर्ती भागांसह देशभरातील सागरी संरचना यांचे बांधकाम करते. तसेच . पारंपारिक इमारतींव्यतिरिक्त, जटिल प्रयोगशाळा, कारखाने, हँगर, दारुगोळा साठवण सुविधा, डॉकयार्ड, जेट्टी /व्हार्व्ह आणि इतर जटिल/विशेष संरचनांच्या बांधकामाचा समावेश आहे.
या प्रसंगी संरक्षण मंत्र्यांनी सर्व संरक्षण सेवांचे अभिनंदन केले आणि मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसेसला सशस्त्र दलांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा पुरवून राष्ट्र उभारणीत आपले योगदान सुरु ठेवण्याचे आवाहन केले.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824911)