कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिष्टमंडळाची कृषी संशोधन संस्था, व्होलकानी, इस्रायल येथे भेट
Posted On:
11 MAY 2022 9:47PM by PIB Mumbai
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिष्टमंडळाने इस्रायलच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कृषी संशोधन संस्था (ARO), व्होलकानी, इस्रायल येथे 10 मे 2022 रोजी भेट दिली. तोमर यांनी कृषी संशोधन संस्थेच्या तज्ञांशी शेतीशी निगडीत विविध तंत्रज्ञान संशोधनाविषयी भारताच्या संदर्भाने चर्चा केली. संरक्षित वातावरणात पिके घेणे, गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन, प्रगत रोप संरक्षण तंत्रज्ञान, अचूक शेती करणे, रिमोट-सेन्सिंग आणि सुगीच्या हंगामानंतरच्या कामांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
कृषी संशोधन संस्था (ARO), व्होलकानी आणि इस्रायलच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या इतर सहा संस्थांनी वनस्पती विज्ञान, प्राणी विज्ञान, वनस्पती संरक्षण, जमीन, जल आणि हवामान विज्ञान, कृषी अभियांत्रिकी आणि सुगी पश्चात आणि अन्न विज्ञान या विषयांत मुलभूत आणि शैक्षणिक संशोधन केले आहे. इस्रायलची शेती पिकांसाठी असलेली जनुके बँक देखील कृषी संशोधन केंद्र, व्होलकानी परिसरातच आहे.
कृषी संशोधन संस्थेचा (ARO) भर विशेषतः दुष्काळी भागातील शेतीवर असून, शेतीसाठी लागणाऱ्या सर्व स्रोतांचा भीषण अभाव असलेल्या इस्रायलला सक्षम करणे आणि जगातील सर्वाधिक कृषी उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक बनविणे, यावर आहे. कृषी संशोधन संस्था, जगातील, आसपासच्या परदेशातील आणि देशातील, शेतीच्या उत्तम पद्धतींचा अवलंब करणाऱ्या संस्थांच्या संपर्कात असते, विशेषतः संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संस्था (FAO)
भारतातून जवळपास 60 पोस्ट डॉक्टरल फेलोशिप मिळालेले पदवीधर कृषी संशोधन संस्थेच्या (ARO) विविध शाखांमध्ये संशोधन करत आहेत. ही पाठ्यवृत्ती सर्वसाधारणपणे तीन महिने ते दोन वर्ष कालावधीची असते. भारतीय शिष्टमंडळाने भारतीय या पदवीधारक संशोधकांशी आणि कृषी संशोधन केंद्र (ARO), व्होलकानी येथील संसाधन व्यक्तीशी देखील संवाद साधला आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाशी निगडीत अनेक मुद्यावर चर्चा केली.
***
S.Patil/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824544)
Visitor Counter : 198