उपराष्ट्रपती कार्यालय
पर्यावरण रक्षणासाठी लोक चळवळ उभारण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
‘हवामान विषयक कृती करण्यात भारताने जगात आघाडी घेतली आहे: उपराष्ट्रपती नायडू
Posted On:
07 MAY 2022 6:54PM by PIB Mumbai
हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सक्षम धोरणांच्या बरोबरीने जनतेने सामूहिक कृती करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज केले. पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
घटती जैवविविधता आणि वातावरणात वाढत्या प्रमाणातील घडत असलेल्या गंभीर घटना यांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्यपूर्ण आत्मपरीक्षण आणि खंबीर कृती करण्याचे आवाहन करत नायडू म्हणाले, “आपला हा ग्रह वाचविणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर हे प्रत्येक नागरिकाचे आणि पृथ्वीवरील प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.”
मोहाली येथील चंदीगड विद्यापीठात पर्यावरणीय विविधता आणि पर्यावरणीय न्यायशास्त्र या विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना उपराष्ट्रपती बोलत होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हवामानविषयक कृती करण्यात भारत नेहमीच जगात आघाडीवर असतो यावर भर दिला. ग्लासगो येथे नुकत्याच पार पडलेल्या कॉप 26 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेली महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याप्रती भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनशैलीच्या निवडीमुळे निर्माण होणारी कार्बन आणि पर्यावरणीय पदचिन्हे यांची जाणीव करून द्यायला हवी. पालक आणि शिक्षकांनी मुलांना त्यांच्या सभोवतालच्या भौतिक वातावरणासारखीच त्यांच्या नैसर्गिक #environmentची- त्यांच्या अवतीभवती असलेल्या पशु-पक्षी जगताची काळजी घेण्याची शिकवण द्यायला हवी. united pic.twitter.com/HQcOMyI7is
भारताचे उपराष्ट्रपती (@VPSecretariat) 7 मे 2022
गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणीय न्यायाची बाजू राखल्याबद्दल भारताच्या सर्वोच्च कायदाव्यवस्थेचे कौतुक करून उपराष्ट्रपती म्हणाले, “निम्न स्तरावरील न्यायालयांनी देखील पर्यावरणकेन्द्री दृष्टीकोन स्वीकारायला हवा आणि त्यांच्या न्यायदानात स्थानिक जनता आणि जैवविविधता यांचे हितरक्षण होईल याची काळजी घ्यावी.” पर्यावरण विषयक कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई आणि ‘प्रदूषण करणाऱ्याने त्याची किंमत चुकवावायला हवी ’ या तत्वाची कडक अंमलबजावणी केली गेली पाहिजे असे ते म्हणाले.
चंदीगड विद्यापीठात पर्यावरणीय विविधता आणि पर्यावरणीय न्यायतत्वशास्त्र या विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आज उद्घाटन करताना उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू. #Environment @Chandigarh_uni pic.twitter.com/E5nY99vPgh
भारताचे उपराष्ट्रपती (@VPSecretariat) 7 मे 2022
निसर्गाचे शोषण करण्याची विघातक पद्धत मोडीत काढण्याच्या गरजेवर भर देत नायडू यांनी परिस्थितीची दखल घेऊन ‘पर्यावरण आणि अर्थव्यवस्था’ यांच्यात उत्तम समतोल राखला जाईल अशा पद्धतीचे कायदे तयार करण्याचे आवाहन त्यांनी कायदेतज्ञांना केले.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823529)
Visitor Counter : 274