माहिती आणि प्रसारण मंत्रालय

जगभरात राष्ट्राचा गौरव वाढविण्यात चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावू शकतात- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर


समृद्ध आशयाच्या बळावर या क्षेत्रात जगातील अग्रेसर उपखंड होण्याची क्षमता भारतात आहे

भारतीय चित्रपट आणि सुप्त सामर्थ्य या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्राचा मुंबईत समारोप: भारतीय चित्रपटांना जागतिक प्रेक्षकांसमोर नेण्यासाठीच्या मार्गांची झाली चर्चा

Posted On: 04 MAY 2022 7:56PM by PIB Mumbai

मुंबई, 4 मे 2022

जगभरात राष्ट्राचा गौरव  वाढविण्यात चित्रपट  हे  महत्त्वाची भूमिका निभावू शकतात  असे प्रतिपादन  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. मुंबई येथे झालेल्या दोन दिवसीय चर्चासत्राच्या समारोप समारंभाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करताना केंद्रीय मंत्री ठाकूर पुढे म्हणाले, जगभरात राष्ट्राचा गौरव  वाढविण्यात चित्रपट महत्त्वाची भूमिका निभावू शकतात . ते आज मुंबईत सांस्कृतिक संबंध विषयक भारतीय परिषद (आयसीसीआर) आणि फ्लेम युनिवर्सिटी  यांच्यावतीने आयोजित भारतीय सिनेमा आणि सॉफ्ट पॉवर या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राच्या समारोप सत्रात ते बोलत होते. भारतीय चित्रपट उद्योग आणि केंद्र सरकार यांनी उच्च स्तरावरून  आज संस्कृतीमधील क्षमतेला ओळखले आहे. एखाद्याच्या संस्कृतीचे चित्रण हा कोणत्याही देशाच्या सुप्त सामर्थ्याचा अत्यंत सशक्त घटक आहे. असे त्यांनी सांगितले. 

कल्पनांच्या बाबतीत जागतिक बाजारामध्ये स्वतःला आकर्षक म्हणून सिध्द करण्याची देशाची क्षमता हा आज समकालीन आंतरराष्ट्रीय संबंधांचा महत्त्वाचा पैलू झाला आहे असे ते पुढे म्हणाले . राष्ट्राचा गौरव  वाढविण्याच्या उपक्रमावर लक्ष केंद्रित करून चित्रपट यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतो, त्यांनी पुढे सांगितले.

वेगवान उदारीकरण, नियमांतून मुक्तता, माध्यमांचे तसेच सांस्कृतिक उद्योगाचे  खासगीकरण यांनी गेल्या काही दशकांत भारतातील चित्रपट उद्योगामध्ये परिवर्तन घडवून आणले आहे आणि त्याच वेळी जागतिक डिजिटल माध्यम उद्योगांचा तसेच वितरण तंत्रज्ञानाचा विस्तार यांच्यामुळे भारतीय मनोरंजन वाहिन्या आणि चित्रपट जागतिक माध्यम अवकाशात अधिक प्रमाणात दृश्यमान झाले आहेत असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

जागतिक नकाशावर भारतीय चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेविषयी बोलताना ठाकूर म्हणाले, हिंदी चित्रपट आज संपूर्ण जगभरात एकाच वेळी प्रदर्शित होतात आणि त्यात असलेले तारे- तारका आता आंतरराष्ट्रीय जाहिरात आणि मनोरंजनाच्या जगतात मान्यता मिळवलेले चेहेरे असतात. ते पुढे म्हणाले, अगदी दूरवरचे आफ्रिकी देश देखील आपले चित्रपट आणि संगीताने मोहित होत आहेत. नायजेरिया सारख्या देशांमध्ये असलेली नॉलीवूड  ही त्यांची चित्रपटसृष्टी भारतीय चित्रपटांकडून मोठ्या प्रमाणात प्रेरणा घेते हे आपण जाणतो. बॉलीवूड आता लॅटिन अमेरिकेसारख्या अनोळखी देशात देखील पोहोचले आहे. आपला चित्रपट आता दक्षिण कोरिया, जपान,चीन यांसारख्या देशांमध्ये प्रवेश करत आहे.

भारतीय भाषांतील चित्रपटांनी बजावलेल्या भूमिकेवर देखील त्यांनी त्यांच्या भाषणात भर दिला. ते म्हणाले, केवळ हिंदी चित्रपटच नव्हे तर इतर भारतीय भाषांमधील चित्रपट देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा प्रेक्षकवर्ग मिळवत आहेत.

शासकीय पातळीवरील मुत्सद्देगिरीला मदत करण्याच्या बाबतीत चित्रपट उद्योगाच्या भूमिकेबाबत बोलताना केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की अधिक मोठ्या समुदायांच्या मदतीने लोकप्रिय झालेल्या आपल्या चित्रपटांचे जागतिकीकरण, भारताच्या शासकीय मुत्सद्देगिरीला प्रोत्साहन देण्यात उपयुक्त ठरू शकेल. आपल्या चित्रपट समुदायाची शक्ती आणि भारताचे सामर्थ्य वापरून भारताचा ब्रँड प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला सार्वजनिक-खासगी भागीदारीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे आणि त्यातून उत्तम दर्जाची आशय निर्माण समृद्ध आशयाच्या बळावर जगातील अग्रेसर उपखंड होण्याची क्षमता भारतात आहे. असे  ते म्हणाले.

चित्रपटाची  उपशीर्षके  परकीय भाषांमध्ये  करण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था  आवश्यक : विनय सहस्रबुद्धे

देशाच्या विविध भागातून 95 पेक्षा अधिक जाणकारांनी या चर्चासत्रात सहभाग  घेतला,ज्यामध्ये भारतीय चित्रपट आणि त्याच्या सुप्त सामर्थ्याच्या संकल्पनेवर प्रथमच चर्चा झाली, असे या कार्यक्रमाला संबोधित करताना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

जगभरात भारतीय चित्रपटांची पोहोच वाढवण्यासाठी, अनेक परदेशी भाषांमध्ये विशेषतः म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया, कझाकस्तान या  भारताचा सांस्कृतिक प्रभाव मजबूत असलेल्या देशांच्या भाषांमध्ये भारतीय चित्रपटांच्या उपशीर्षकांसाठी संस्थात्मक व्यवस्था उभारण्याला समर्थन सहस्रबुद्धे यांनी समर्थन दर्शवले. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, भारतात परदेशी भाषा प्रशिक्षण आणि सुप्त सामर्थ्य  या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करेल, अशी माहिती सहस्रबुद्धे यांनी दिली. मागे सोडलेल्या संस्कृतीच्या  भूतकाळातील रम्य  आठवणीं ज्यांच्या स्मरणात आहेत अशा अनिवासी भारतीयांना आम्ही आपल्या  भाषेतील सिनेमा दाखवू शकतो, असे  भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षांनी सांगितले. 'चित्रपट पुरस्कारांमध्ये 'सुप्त सामर्थ्य प्रसारस्नेही चित्रपट' यासारखी श्रेणी सादर केली जाऊ शकते, असे ते म्हणाले. भारताविषयी सर्वसमावेशक आणि योग्य समज दाखवणाऱ्या चित्रपटांना या श्रेणीत पुरस्कार मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

 

Jaydevi PS/S.Thakur /Sanjana /Sonal/PM

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1822737) Visitor Counter : 176


Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati