राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी दिल्लीतील भगवान महावीर अत्याधुनिक रुग्णालयाची बसविली कोनशीला
Posted On:
03 MAY 2022 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2022
भारताचे राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी आज (3 मे 2022) दिल्ली इथे भगवान महावीर सुपर स्पेशालिटी या अत्याधुनिक सोयी-सुविधा देणाऱ्या रुग्णालयाची पायाभरणी केली.
जैन परंपरेत सेवेला प्राधान्य देण्यात आले आहे,असे यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले.कोविड अद्याप पूर्णपणे संपलेला नाही,असे सांगून खबरदारीची सूचना त्यांनी लोकांना यावेळी दिली. सर्व नागरिकांनी सतर्क राहून शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रपती म्हणाले की, जैन परंपरा आपल्याला संतुलित आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची शिकवण देते. सध्याच्या काळातील जीवनशैली आणि आहाराच्या सवयी निसर्गाला अनुकूल नाहीत.आपल्याला माहित आहे, की जैन मुनी आणि त्यांचे शिस्तबद्ध अनुयायी अन्नग्रहण फक्त सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यान करतात .सूर्याच्या दैनंदिन मार्गक्रमणेनुसार जीवनशैली अंगीकारणे, हा निरोगी राहण्याचा सोपा उपाय आहे.जैन मुनींच्या आदर्श जीवनशैलीतून आपल्याला हीच शिकवण मिळते. रूग्णालयातील आधुनिक वैद्यकीय प्रणालींसोबत अशा वैज्ञानिक परंपरांचे एकत्रीकरण आरोग्यदायी जीवनासाठी उपयुक्त ठरेल,असेही ते म्हणाले.
राष्ट्रपतींच्या हिंदीतल्या भाषणासाठी येथे क्लिक करा.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1822359)
Visitor Counter : 179