अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल 2022 मध्ये 1.68 लाख कोटींचे आतापर्यंतचे उच्चांकी  जीएसटी महसूल संकलन

Posted On: 01 MAY 2022 4:15PM by PIB Mumbai

 

एप्रिल 2022 मध्ये एकत्रित जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,67,540 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 33,159 कोटी, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 41,793 कोटी, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 81,939 कोटी  (माल आयातीवर संकलित केलेल्या रु. 36,705 कोटींसह) आणि उपकर 10,649 कोटी रुपये ( मालाच्या आयातीवर संकलित  केलेल्या रु. 857 कोटींसह).यांचा समावेश आहे.

एप्रिल 2022 मध्‍ये झालेले सकल जीएसटी  संकलन हे आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी महसूल संकलन आहे.  त्या आधीच्या  महिन्यात नोंदवण्यात आलेल्या 1,42,095 कोटी रुपये जीएसटी संकलनाच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलन 25,000 हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला  33,423 कोटी रुपये  आणि  सीजीएसटीला  26962 कोटी रुपये चुकते केले आहेत.

नियमित समझोत्यानंतर  एप्रिल 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी   66,582 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 68,755 कोटी रुपये आहे.

एप्रिल 2022 चा जीएसटी  महसूल हा  मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 20% जास्त आहे.या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल 30% अधिक नोंदवण्यात आला. आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षी  याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 17% अधिक आहे.

सकल जीएसटी संकलनाने प्रथमच 1.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.मार्च 2022 मध्ये निर्माण एकूण ई-वे देयकांची  संख्या 7.7 कोटी होती, जी फेब्रुवारी 2022 मध्ये निर्माण  झालेल्या 6.8 कोटी ई-वे देयकांपेक्षा  13% ने अधिक आहे,ही वाढ व्यावसायिक व्यवहार वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे प्रतिबिंबित करते.

एप्रिल 2021. मध्ये दाखल केलेल्या एकूण 92  लाख विवरणपत्रांच्या तुलनेत. एप्रिल 2022 मध्ये, जीएसटीआर -3बी  मध्ये 1.06 कोटी जीएसटी विवरणपत्र  भरण्यात आली  त्यापैकी 97 लाख विवरणपत्र मार्च 2022 या  महिन्याशी संबंधित आहेत.

एप्रिल 2021 च्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या  जीएसटी महसुलाची  राज्यनिहाय  आकडेवारी खालील तक्त्यांमध्ये दिली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001VMEG.png

 

State-wise growth of GST Revenues during April 2022

State

Apr-21

Apr-22

Growth

Jammu and Kashmir

509

560

10%

Himachal Pradesh

764

817

7%

Punjab

1,924

1,994

4%

Chandigarh

203

249

22%

Uttarakhand

1,422

1,887

33%

Haryana

6,658

8,197

23%

Delhi

5,053

5,871

16%

Rajasthan

3,820

4,547

19%

Uttar Pradesh

7,355

8,534

16%

Bihar

1,508

1,471

-2%

Sikkim

258

264

2%

Arunachal Pradesh

103

196

90%

Nagaland

52

68

32%

Manipur

103

69

-33%

Mizoram

57

46

-19%

Tripura

110

107

-3%

Meghalaya

206

227

10%

Assam

1,151

1,313

14%

West Bengal

5,236

5,644

8%

Jharkhand

2,956

3,100

5%

Odisha

3,849

4,910

28%

Chattisgarh

2,673

2,977

11%

Madhya Pradesh

3,050

3,339

9%

Gujarat

9,632

11,264

17%

Daman and Diu

1

0

-78%

Dadra and Nagar Haveli

292

381

30%

Maharashtra

22,013

27,495

25%

Karnataka

9,955

11,820

19%

Goa

401

470

17%

Lakshadweep

4

3

-18%

Kerala

2,466

2,689

9%

Tamil Nadu

8,849

9,724

10%

Puducherry

169

206

21%

Andaman and Nicobar Islands

61

87

44%

Telangana

4,262

4,955

16%

Andhra Pradesh

3,345

4,067

22%

Ladakh

31

47

53%

Other Territory

159

216

36%

Center Jurisdiction

142

167

17%

Grand Total

1,10,804

1,29,978

17%

 

***

S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1821802) Visitor Counter : 482