वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

आहार 2022 मध्ये DPIIT ने उभारलेल्या GI पॅव्हेलियनमध्ये 25 उत्पादनांचे प्रदर्शन

Posted On: 30 APR 2022 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2022

 

विशिष्ट ठिकाणी बनविलेल्या उत्पादनांच्या (GI) विक्रीला भारतात चालना देण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार विकास विभागाने 26 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 हे पाच दिवस ITPO इथे GI पॅव्हेलियन उभारले होते. या कार्यक्रमात भारतीय परंपरा, संस्कृती आणि उद्यमशीलता एकाच छताखाली प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. यावेळी देशभरातील विविध 25 उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले होते.

आहार 2022 ला व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली, ज्याचा GI धारकांना संपर्क वाढविण्यास आणि व्यवसायाला चालना देण्यास लाभ झाला. भेट देणाऱ्यांमध्ये आघाडीच्या हॉटेल, उपहारगृहे, खानपान उद्योग/संस्था, आयातक, खरेदीदार/वितरक  होते, ज्यांनी अन्न, आदरातिथ्य उद्योग आणि उपकरण यातील सर्वोत्तम उत्पादने विकत घेण्यासाठी इथे भेट दिली.

आहार 2022 इथल्या GI पॅव्हेलियनमध्ये उत्पादकांना केवळ त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्याचीच संधी दिली असे नाही, तर व्यावसायिकांशी जोडले गेले. इथे प्रदर्शित करण्यात आलेल्या उत्पादनांत महाराष्ट्रातील सांगलीच्या मनुका, सोलापूरचे डाळिंब, तामिळनाडूची इरोड मंजाल’ हळद, नवारा तांदूळ आणि केरळच्या पलक्कडचा मट्टा, आंध्रप्रदेशचा बंदर लड्डू आणि इतर अनेक उत्पादनांचा समावेश होता. भारताचा आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ देखील या प्रदर्शनात सहभागी झाला होता. या महासंघाने आदिवासी समुदायांची नागा मिरचा, चाक हाओ तांदूळ, आसाम चहा (पारंपारिक) अशा GI उत्पादनांचे प्रदर्शन केले.

 

* * *

S.Kane/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821643) Visitor Counter : 96


Read this release in: English , Urdu , Hindi