PIB Backgrounder
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 27 APR 2022 7:31PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 188.19 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 16,279
  • Active cases stand at 0.04%
  • Recovery Rate currently at 98.75%
  • 2,252 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,25,25,563
  • 2,927 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.58%)
  • Weekly Positivity Rate (0.59%)
  • 83.59 cr Total Tests conducted so far; 5,05,065 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Infographic on Covid-19 Updates

नवी दिल्‍ली/मुंबई, 27 एप्रिल 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 188.19 (1,88,19,40,971) कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,31,48,146 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.75 (2,75,34,619) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक खबरदारीच्या मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 5,17,547 जणांना खबरदारीच्या मात्रा देण्‍यात आल्या आहेत.

भारतात रुग्णसंख्या सध्या 16,279 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% आहे.गेल्या 24 तासांत 2,252 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,25,563 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,927 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 5,05,065  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.59 (83,59,74,079)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.59% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.58% आहे.

 

इतर अपडेट्स :

  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 19.70 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या उपयोगी मात्रा, शिल्लक आहेत.

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

* * *

S.Patil/D.Rane


(Release ID: 1820665) अभ्यागत कक्ष : 187