मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री संजीव कुमार बलयान यांच्याकडून पशुंच्या अत्याधुनिक प्रजनन तंत्रज्ञानावर भर


राष्ट्रीय पशुधन मिशन आणि राष्ट्रीय गोकुळ मिशनचे पुन्हा विलीनीकरण

Posted On: 27 APR 2022 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2022

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ अभियानाचा भाग, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयातर्फे, त्यांच्या विभागाच्या उद्यमशीलतेविषयक योजना आणि इतर लाभदायी पथदर्शी कार्यक्रमांविषयी जनजागृती करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जात आहे. सामाईक सेवा केंद्रांच्या माध्यमातून देशभरातील  8000 गावपातळीवर शिबिरे घेऊन ही जनजागृती केली जात आहे. 25 एप्रिल पासून सुरु झालेला हा उपक्रम 28 एप्रिल 2022 पर्यंत चालणार आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001S4CK.jpg

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री संजीव कुमार बलियान यांनी काल अशाच एका शिबिरात आलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आता सरकारने राष्ट्रीय पशुधन मिशन आणि राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनांना पुन्हा परस्परांशी जोडले आहे, आणि  ब्रीडर फार्म म्हणजेच प्रजनन केंद्र उद्योग आणि चारा उद्योग त्याचे घटक बनविण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. ईशान्य भारत, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल या राज्यातील एक लाखांपेक्षा अधिक शेतकरी या शिबिरात सहभागी झाले होते.  राष्ट्रीय पशुधन मिशनमुळे ग्रामीण उद्यमी निर्माण करण्यात आणि गावातील बेरोजगार युवकांसाठी उदरनिर्वाहाच्या उत्तम संधी तयार करण्यात मदत होईल. दुभती जनावरे, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मेंढीपालन, बकरी पालन, वराहपालन, चारा आणि इतर दाणापाणी अशा सर्व  क्षेत्रांना व्यवसायाच्या संधी मिळून, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत त्यामुळे मदत होईल, असे त्यांनी सांगितले. अत्याधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाच्या अंगीकारावर त्यांनी भर दिला तसेच त्याची खालच्या स्तरापर्यंत अंमलबजावणी होईल, याकडे लक्ष देण्याची सूचना केली. तसेच, कृत्रिम रेतन आणि सिलेज म्हणजेच सुरक्षित हिरवा चारा बनवण्याच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्याची विनंती बलियान यांनी शेतकऱ्यांना केली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002ZK03.jpg

मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन विभागाचे सचिव,  जतिंद्र नाथ स्वाइन यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री  मत्स्य  संपदा योजना आणि मत्स्य तसेच जलसृष्टी पायाभूत सुविधा विकास निधी विषयी माहिती दिली. मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथदर्शी योजनांचा लाभ देशभरातील मच्छिमार आणि मत्स्यशेती व्यावसायिक  घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1820548) Visitor Counter : 176