श्रम आणि रोजगार मंत्रालय
देशातल्या कामगार दल सहभाग दरामध्ये (एलएफपीआर) घट झाल्याबाबत काही प्रसार माध्यमांमधील बातम्यांविषयी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने जाहीर केलेले पत्रक
कामाचे वय असलेल्या निम्म्या लोकांनी काम मिळण्याची आशा गमावली आहे, असे अनुमान काढणे वास्तविक चुकीचे
2017-18 ते 2019-20 या कालावधीत कामगार दल आणि कार्यबल यांच्यामध्ये सातत्याने वाढ
Posted On:
26 APR 2022 10:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2022
रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासंबंधीचा विषय केंद्र सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे आणि देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मंत्रालये/ विविध विभाग यांच्याकडून अनेक पावले उचलली जात आहेत.
लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट (एलएफपीआर- कामगार दल सहभाग दर) म्हणजे लोकसंख्येपैकी काम करणा-या म्हणजेच रोजगार असलेल्या किंवा काम शोधत आहे, (बेरोजगार), त्यांची टक्केवारी असते. इथे सर्वात महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काम करण्यास पात्र असलेल्या वयोगटातली संपूर्ण लोकसंख्या काम शोधत किंवा काम करत असेलच असे नाही. कारण यापैकी ब-याच जास्त संख्येने लोक एकतर शिक्षण घेत असतात. (ही मंडळी माध्यमिक/उच्च माध्यमिक/ तांत्रिक शिक्षण घेत असतात) किंवा स्वतःच्या उपयोगासाठी वस्तूंचे उत्पादन घेत असतात, यामध्ये घरगुती व्यवसाय, घरातल्या सदस्यांची देखभाल, सेवा, स्वयंसेवा, प्रशिक्षण यासारख्या विनाकमाईच्या कामामध्ये व्यग्र असतात. त्यामुळे काम करणा-या वयोगटातील अर्ध्या लोकांना कामाची आशाच उरली नाही, असे काही प्रसार माध्यमांनी बांधलेला अंदाज वास्तविक चुकीचा आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या 2019-20 च्या अहवालानुसार, 10 कोटींपेक्षा अधिक लोकांनी माध्यमिक, उच्च माध्यमिक, उच्च किंवा तांत्रिक शिक्षणासाठी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे 49 टक्के महिला होत्या. उच्च शिक्षण घेणारे यापैकी बहुतांश विद्यार्थी हे कामाच्या वयोगटातल्या लोकसंख्येमध्ये गणले जातात. परंतु ते सर्वच कदाचित काम शोधतही नसतील. त्याचप्रमाणे घरातल्या सदस्यांसाठी विनावेतन घरगुती सेवांमध्ये गुंतलेल्या सर्व महिला कदाचित वेतन मिळण्यासारखे काम शोधत नसतील.
श्रम बल सर्वेक्षण (एलएफएस)च्या वार्षिक नियतकालिकामधील अहवालानुसार एलएफपीआर म्हणजचे श्रम दल सहभाग दर, कामगार लोकसंख्या गुणोत्तर (डब्ल्यूपीआर) आणि बेरोजगारी दर (यूआर) 15 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसाठी नेहमीच्या स्थितीमध्ये खालीलप्रमाणे होते
(टक्केवाारीमध्ये)
Year
|
WPR
|
LFPR
|
UR
|
Male
|
Female
|
Total
|
Male
|
Female
|
Total
|
Male
|
Female
|
Total
|
2017-18
|
71.2
|
22.0
|
46.8
|
75.8
|
23.3
|
49.8
|
6.1
|
5.6
|
6.0
|
2018-19
|
71.0
|
23.3
|
47.3
|
75.5
|
24.5
|
50.2
|
6.0
|
5.1
|
5.8
|
2019-20
|
73.0
|
28.7
|
50.9
|
76.8
|
30.0
|
53.5
|
5.0
|
4.2
|
4.8
|
- पीएलएफएसची आकडेवारीवरून असे दिसून येते की, 2017-18 ते 2019-20 या कालावधीमध्ये देशातल्या कामगार दल आणि कार्य दलामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. तसेच दुस-या बाजूला बेरोजगारी दर कमी झाला आहे.
- वरील आकडेवारीवरून अधिक स्पष्ट होते की, 2017-18 ते 2019-20 या वर्षांमध्ये महिला श्रमशक्ती आणि महिला कामगार लोकसंख्येचे प्रमाण हे पुरूष श्रमशक्ती आणि कामगार लोकसंख्येतील वाढीच्या तुलनेत जास्त आहे.
(in crore)
Year
|
Labour Force
|
Employment
|
Unemployment
|
2017-18
|
50.95
|
47.14
|
3.83
|
2018-19
|
51.82
|
48.78
|
3.04
|
2019-20
|
56.34
|
53.53
|
2.81
|
त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीत (क्यूईएस)- एप्रिल ते जून 2021 9 क्षेत्रांमध्ये अंदाजे एकूण रोजगार 3.08 कोटी आहे. सहाव्या आर्थिक जनगणनेमध्ये (2013-14) या क्षेत्रांमध्ये एकूण 2.37 कोटी जणांना रोजगाराची नोंद आहे. यावरून प्रत्यक्षात रोजगारात झालेली वाढ 29 टक्के आहे, असे दिसून आले आहे.
त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणाच्या दुस-या फेरीत (जुलै-सप्टेंबर 2021) निवडण्यात आलेल्या 9 क्षेत्रांमध्ये एकूण रोजगार 3.10 कोटी जणांना मिळाला आहे. याचा अर्थ पहिल्या फेरीपेक्षा जास्त दोन लाख जणांना रोजगार प्राप्त झाला आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये (ईपीएफओ) वेतनपटावरील आकडेवारीनुसार औपचारिक क्षेत्रातील मध्यम आणि मोठ्या आस्थापनांमध्ये कमी वेतन असलेल्या कामगारांना समाविष्ट करून घेतले जाते.
2020-21 च्या तुलनेमध्ये 2021-22 (फेेब्रुवारी 2022 पर्यंत) मध्ये ईपीएफ सदस्यांमध्ये 44 टक्क्यांची निव्वळ वाढ झाल्याचे ताज्या माहितीवरून दिसून येत आहे.
मार्च 2022 मध्ये सर्वकालीन उच्च सकल जीएसटी संकलन आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताची सर्वकालीन उच्च एकूण निर्यात यासारख्या आर्थिक क्रियाकलापांमुळे देशामध्ये रोजगार निर्मितीच्या सकारात्मक प्रवृत्तीला आधार मिळत असल्याचे संकेत आहेत.
* * *
S.Kakade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1820320)
Visitor Counter : 348