पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी-20 मधील भारताचे अध्यक्षपद हे भारत आणि आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था, इरेना या दोघांसाठीही अशी सुवर्ण संधी आहे की ज्यामुळे नवीकरणीय ऊर्जा, विकसनशील देशांच्या विकासाच्या आकांक्षांशी तडजोड न करता, कोणालाही मागे न ठेवता लवकरच उद्योगांतील संक्रमणाला गती देऊ शकेल: श्री भूपेंद्र यादव


हवामान बदलातील अधिकाधिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये इरेना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकते: श्री यादव

भारताच्या नेतृत्वाअंतर्गत केंद्रीय मंत्र्यांनी इरेनाला सीडीआरआय आणि लीड आयटीचा भाग होण्यासाठी केला आग्रह

पर्यावरण मंत्री श्री भूपेंद्र यादव यांनी आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्थेच्या महासंचालकांची घेतली भेट

Posted On: 26 APR 2022 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2022

 

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, श्री भूपेंद्र यादव आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्थाचे (IRENA) महासंचालक, महामहीम श्री फ्रान्सेस्को ला कमेरा, यांची येथे आज भेट घेतली. दोन्ही मान्यवरांनी इरेनाला जी-20 मधील भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात ते योगदान देऊ शकतात,असे सांगत आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था (इरेना ,IRENA) आणि भारत यांच्यातील प्रतिबद्धता मजबूत करण्यासह परस्पर हिताच्या इतर मुद्द्यांवर चर्चा केली.

इरेनाचे नवीकरणीय ऊर्जेवरील, विशेषत: सौर ऊर्जेवरील प्रचंड जागतिक अनुभव पाहता, केंद्रीय मंत्री म्हणाले, की सीओपी -26 मध्ये आमच्या माननीय पंतप्रधानांनी घोषित केलेल्या हवामान बदलांसाठी केलेल्या  विशेष उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी भारताच्या प्रयत्नांमध्ये इरेना खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

भारताला मिळालेले जी-20 चे अध्यक्षपद भारत आणि इरेना या दोघांसाठी ही सुवर्णसंधी आहे, असे  सांगत नवीकरणीय उर्जा,विकसनशील देशांच्या विकासाच्या आकांक्षांशी तडजोड न करता आणि कोणालाही मागे न ठेवता उद्योगातील संक्रमणास गती देऊ शकते, यावर श्री यादव यांनी भर दिला.

इरेना आणि भारत यांच्यातील प्रतिबद्धता मजबूत करताना आम्ही जी-20 आणि विद्यमान व्यवस्थेच्या पलीकडे देखील पाहू शकतो,असे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी अधोरेखित केले. भारताच्या नेतृत्वाअंतर्गत इरेना, सीडीआरआय(CDRI) आणि लीड आयटी (LeadIT) चा भागही  कसा असू शकते.

दोन्ही बाजूंनी, भारतासारख्या विकसनशील देशांद्वारे हवामान बदलांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वित्त, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि क्षमता निर्माण समर्थनासह अंमलबजावणीची साधने उपलब्ध करण्याच्या महत्त्वावर चर्चा केली.

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1820146) Visitor Counter : 169


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil