राष्ट्रपती कार्यालय

भारतात ‘वाद-विवाद’ आणि ‘संवादाची’ फार मोठी परंपरा आहे, आपण वारशाशी पुन्हा जोडले जाण्याची गरज आहे : राष्ट्रपती कोविंद

Posted On: 18 APR 2022 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2022

भारतात ‘वाद-विवाद’ आणि ‘संवादाची’ फार मोठी परंपरा आहे. आज आपण आपल्या वारशाशी पुन्हा जोडले जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. ते आज (18 एप्रिल 2022) दिल्ली येथे इंडिया इंटरनॅशनल सेंटर (आयआयसी)च्या हिरक महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. भारताचे प्राचीन तत्वज्ञान  जे ‘दर्शनशास्त्र; म्हणून ओळखले जाते, हे जगात इतरत्र निर्माण झालेल्या तत्त्वज्ञानापेक्षा अतिशय मजबूत आणि नेमके आहे अशी मान्यता देण्यात आली आहे, असे राष्ट्रपती म्हणले. युवकांमध्ये, केवळ सत्य जाणून घेण्यासाठीच नव्हे तर सत्यापर्यंत पोचण्यासाठी आवश्यक चिकित्सक विचार करण्याच्या दृष्टीने महत्वाचे साधन म्हणून याविषयी अधिक शिकण्याची विशेष रुची आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

या संस्थेच्या संस्थापकांकडे भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज घेण्याची दूरदृष्टी होती आणि आयआयसी या नवीन भारताच्या विकासात कशा प्रकारे सहभागी होऊ शकेल आणि जागतिक वादविवादात, चर्चांमध्ये कशाप्रकारे योगदान देऊ शकेल याचा त्यांनी विचार केला होता. अशा प्रकारच्या चर्चा या नेहमीच काळानुरूप होत्या.

आपल्या हिरक महोत्सवी वर्षात आयआयसीने महिला आणि लिंगभेद या विषयीच्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे, हे अधोरेखित करून राष्ट्रपती म्हणाले, आज आपण ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणजेच स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहोत, तेव्हा आपण महिलांच्या महत्वपूर्ण उपलब्धी तसेच बदल घडवून आणणारे अनेक कायदेशीर आणि सामाजिक उपक्रम जनतेपर्यंत पोचवले पाहिजेत.

आपल्या अर्थव्यवस्थेच्या दुर्लक्षित क्षेत्रात महिलांचा सहभाग फार मोठा आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. महिला कार्याशाक्तीचे अधिक सक्षमीकरण कार्यासाठी औपचारिक अर्थव्यवस्थेत अजूनही खूप काही करण्याची गरज आहे. ‘STEMM’ म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि व्यवस्थापन, यामध्ये जास्तीत जास्त सहभागासाठी महिलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. देशाच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला त्यांच्या गुणवत्तेमुळे आणि आव्हानांचा सामना करण्याच्या नाविन्यपूर्ण मार्गांमुळे फायदाच होणार आहे.

राष्ट्रपतींचे भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1817891) Visitor Counter : 175