राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी ईस्टरच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा

Posted On: 16 APR 2022 7:15PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईस्टरच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ईस्टरच्या शुभ प्रसंगी, मी भारतात आणि परदेशात राहणा-या सर्व नागरिकांना, विशेषत: ख्रिस्ती समुदायातील लोकांना माझ्या शुभेच्छा देतो आणि मनःपूर्वक अभिनंदन करतो असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

ईस्टर हा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा उत्सव साजरा करण्याचा प्रसंग आहे. हा आपल्याला प्रेम, त्याग आणि क्षमा या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो.  आपण येशू ख्रिस्ताच्या जीवनातून शिकूया आणि संपूर्ण मानवजातीच्या भल्यासाठी एकत्र काम करूया.

या सणात आपल्यामध्ये पुन्हा एकतेची भावना निर्माण होऊ देत तसेच आपल्या राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी आपली वचनबद्धता अधिक दृढ होऊ दे.

राष्ट्रपतींचा संदेश हिंदीत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

***

S.Patil/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1817352) Visitor Counter : 141