संरक्षण मंत्रालय
सेशेल्स तटरक्षक दलाच्या नौसैनिकांची वैद्यकीय सुटका
Posted On:
14 APR 2022 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022
भारतीय नौदलाच्या, दक्षिण कमांडची युद्धनौका आयएनएस गरुडा वर तैनात अत्याधुनिक हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरने सेशेल्स च्या तटरक्षक जहाज-झोरोस्टार वरील महिला नौसैनिकाची आज म्हणजेच 14 एप्रिल 2022 रोजी वैद्यकीय सुटका केली. आयएनएस शारदा ही युद्धनौका या जहाजासोबत चालत होती. हे जहाज, कोचीहून सेशेल्सच्या व्हिक्टोरिया इथे जात होते. आज, सकाळी साडे नऊ वाजता, एससीजीएस झोरोस्टारवरील एका महिला कर्मचाऱ्याच्या पोटात अतिशय वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिला त्वरित बोटीने आयएनएस शारदा वर आणण्यात आलं, जेणेकरुन तिला वैद्यकीय सुविधा मिळू शकतील.
ही माहिती मिळताच, भारतीय बनावटीचे अत्याधुनिक हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर एएलएच आणि सी-किंग 42 सी हेलिकॉप्टर कोची इथे वैद्यकीय सुटकेच्या प्रक्रियेसाठी सज्ज करण्यात आले दुपारी साडे बाराच्या सुमाराला, या दोन्ही जहाजांनी आयएनएस गरुडा या युद्धनौकेवरुन आयएन एस शारदावर जाण्यासाठी उड्डाण केले. आयएनएस शारदा, मिनिकोय बेटापासून सुमारे 15 किमी अंतरावर होते. दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांनी, ही हेलिकॉप्टर्स रुग्ण महिलेसह गरुडा नौकेयावर पोहोचली. त्यानंतर रुग्ण महिलेला आयएनएचएस संजीवनी इथे नेण्यात आले. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1816907)
Visitor Counter : 199