सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त कृतज्ञ राष्ट्राचे त्यांना अभिवादन

प्रविष्टि तिथि: 14 APR 2022 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022

राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या नेतृत्वाखाली, आज संपूर्ण राष्ट्र भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. राष्ट्रपतींनी संसद भवन परिसरात असलेल्या डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.

यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी भारतीय संविधानांचे शिल्पकार डॉ आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण केली.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ विरेन्द्र कुमार आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी देखील डॉ आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1816799) आगंतुक पटल : 222
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu