आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आत्तापर्यंत लसीच्या 186 कोटी 22 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष वयोगटातील किशोरावयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 2 कोटी 36 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 11,058 आहे

गेल्या 24 तासांत देशात 1,007 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.25%

Posted On: 14 APR 2022 11:41AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 186 कोटी 22 लाखांचा (1,86,22,76,304) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,26,31,632 सत्रांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.36 कोटीहून अधिक (2,36,92,551) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे, 10 एप्रिल 2022 पासून 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रा देण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 62,683 प्रिकॉशन मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या गटनिहाय विभागणीत खालील मात्रांचा समावेश आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,04,276

2nd Dose

1,00,07,284

Precaution Dose

45,74,859

FLWs

1st Dose

1,84,14,188

2nd Dose

1,75,24,263

Precaution Dose

70,90,622

Age Group 12-14 years

1st Dose

2,36,92,551

2nd Dose

30,964

Age Group 15-18 years

1st Dose

5,78,02,182

2nd Dose

4,01,10,045

Age Group 18-44 years

1st Dose

55,51,80,802

2nd Dose

47,17,06,600

Precaution Dose

13,630

Age Group 45-59 years

1st Dose

20,28,40,086

2nd Dose

18,65,87,681

Precaution Dose

49,053

Over 60 years

1st Dose

12,68,06,150

2nd Dose

11,62,28,014

Precaution Dose

1,32,13,054

Precaution Dose

2,49,41,218

Total

1,86,22,76,304

देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम ठेवत भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होऊन 11,058 झाली आहे, देशातील आत्तापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या केवळ 0.03% आहे.

परिणामी, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.76% आहे. गेल्या 24 तासांत 818 रुग्ण बरे झाले आहेत आणि बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या सुरुवातीपासून) आता 4,25,06,228 वर आहे.

गेल्या 24 तासांत 1,007 नवीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,34,877 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 83.08 कोटीहून अधिक (83,08,10,157) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर देखील सातत्याने कमी होत आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.25% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील 0.23%  इतका नोंदला गेला आहे.

 

 

 

 

 

 

S.Thakur/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1816679) Visitor Counter : 182