उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राम नवमीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशातील जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 09 APR 2022 9:34PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी राम नवमीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे -

भगवान रामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या रामनवमीच्या शुभ प्रसंगी मी आपल्या देशातील जनतेला  हार्दिक शुभेच्छा देतो.

भारतीय परंपरेत, भगवान राम सदाचार , धैर्य आणि करुणा या गुणांचे प्रतीक आहेत. त्यांचे जीवन सत्य, न्याय, ज्येष्ठांचा आदर आणि सर्व मानवांप्रति  प्रेम आहे. मर्यादा पुरुषोत्तमभगवान राम हे आदर्श राजा, आज्ञाधारक पुत्र, प्रेमळ भाऊ आणि खऱ्या अर्थाने प्रेरणा स्रोत म्हणून पूज्यनीय  आहेत . भगवान राम यांचे जीवन आपल्याला त्यांचे उदात्त आदर्श आणि उच्च नैतिक मूल्ये जपण्यासाठी प्रेरणा देते.

रामनवमीचे हे पर्व  आपल्या जीवनात शांतता  आणि आनंद घेऊन येवो आणि प्रभू रामाने जोपासलेली  चिरंतन मूल्ये आपल्याला मार्गदर्शन करत राहो.

***

S.Kakade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815304) Visitor Counter : 158