नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

सागरमालाला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हाती घेतलेले सागरमाला प्रकल्प जेएनपीएने केले अधोरेखित


महाराष्ट्रात 1.05 लाख कोटीं रुपयांचे 131 प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित

जेएनपीएचे प्रकल्प बंदर व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देऊन भारतीय आयात निर्यात अधिक उंचीवर घेऊन जातील : अध्यक्ष जेएनपीए

Posted On: 08 APR 2022 7:39PM by PIB Mumbai

मुंबई, 8 एप्रिल 2022

 

सागरमालाला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने  (जेएनपीए ), आज 08 एप्रिल 2022 रोजी मुंबई येथे  प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली प्रसारमाध्यमांशी  संवाद आयोजित केला होता. सागरमाला हा 2015 मध्ये भारत सरकारने सुरू केलेला नौवहन मंत्रालयाचा पथदर्शी  कार्यक्रम आहे.

बंदर आधारितऔद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी सरकारच्या सागरमाला उपक्रमामध्ये  जेएनपीएची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.  गतिशीलता  बदलण्यासह भारतातील लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी,बंदरांच्या माध्यमातून एकूण आर्थिक विकासाला चालना आणि मंत्रालयाद्वारे समुद्रकिनारी असलेल्या समुदायांना सक्षम बनवण्यासाठी जेएनपीएकडे सागरमाला अंतर्गत चौसूत्रीवर  आधारित अनेक प्रकल्प आहेत.''असे यावेळी बोलताना जेएनपीएच्या अध्यक्षांनी सांगितले.

 महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात असलेल्या अफाट क्षमतेमुळे, महाराष्ट्रात 1.05 लाख कोटी रुपयांचे 131 प्रकल्प राबवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.131 प्रकल्पांपैकी 29 प्रकल्प जेएनपीएने हाती घेतले आहेत. जेएनपीएने हाती घेतलेल्या प्रकल्पांची किंमत  80,000 कोटी रुपये  आहे,  असे सेठी यांनी सांगितले. तसेच उर्वरित प्रकल्पांच्या  अंमलबजावणीची प्रक्रिया  सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

जेएनपीएचे प्रकल्प बंदर व्यवसायात सुलभतेसाठी प्रोत्साहन देतील आणि भारतीय आयात निर्यातीला अधिक उंचीवर नेतील, असेही अध्यक्षांनी नमूद केले.

जेएनपीएच्या प्रकल्पांमध्ये चौथे कंटेनर टर्मिनल, जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्र , वर्धा आणि जालना येथील ड्राय पोर्ट्स, अतिरिक्त लिक्विड कार्गो जेट्टी यांचा समावेश आहे.

बंदर आधुनिकीकरण आणि नवीन बंदर विकास, बंदर  कनेक्टिव्हिटीचा  विस्तार , बंदर आधारित औद्योगिकीकरण , किनारपट्टीवरील समुदाय विकास आणि किनारी नौवहन या सागरमाला कार्यक्रमाच्या पाच स्तंभांनुसार जेएनपीएने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत.

सागरमाला कार्यक्रम

देशाच्या अर्थव्यवस्थेत सागरी पायाभूत सुविधा महत्त्वाची भूमिका बजावतात. सागरी क्षेत्र भारत दृष्टिकोन 2030 च्या अनुषंगाने, सागरमाला उपक्रम पायाभूत सुविधांना अधिक चालना देईल आणि व्यापाराला मदत करण्यासाठी प्रादेशिक संपर्क सुधारण्यासाठी गुंतवणूक वाढवेल. सागरमाला उपक्रमाने भारतीय बंदरांना अधिक कार्यक्षम बनवून आणि कंटेनरचा टर्नअराउंड वेळ कमी करून मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यास सक्षम केले आहे. बंदर आधुनिकीकरण, रेल्वे, रस्ता, क्रूझ पर्यटन, रोरो, रोपॅक्स, मत्स्यपालन, किनारी पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकास यासारख्या विविध श्रेणींमध्ये असंख्य प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

परिषदेदरम्यान, सागरमाला कार्यक्रमांतर्गत जेएनपीएने हाती घेतलेल्या असंख्य प्रकल्पांचा व्हिडिओ आणि सादरीकरण प्रसारमाध्यमांसमोर सादर करण्यात आले, त्यानंतर अध्यक्षांसोबत संवादात्मक सत्र झाले.

माहिती देताना केलेले पीपीटी सादरीकरण पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण JNPA विषयी: नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. 26 मे 1989 रोजी सुरू करण्यात आलेले, तीन दशकांहून कमी कालावधीत, JNPA हे मोठ्या -कार्गो टर्मिनलमधून देशातील प्रमुख कंटेनर बंदरामध्ये रूपांतरित झाले आहे.

सध्या जेएनपीए पाच कंटेनर टर्मिनल चालवते: जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लिमिटेड (GTIPL), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (NSIGT) आणि नव्याने सुरू झालेले भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (BMCTPL). बंदरात सामान्य मालवाहतूक करण्यासाठी उथळ पाण्याचा धक्का आणि दुसरा द्रव मालवाहू टर्मिनल आहे जो BPCL-IOCL कन्सोर्टियम आणि नव्याने बांधलेल्या किनारी धक्क्याद्वारे व्यवस्थापित केला जातो.

 

 

 

 

S.Kane/S.Chavan/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1815044) Visitor Counter : 212


Read this release in: English , Urdu , Hindi , Assamese