वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
शिक्षणक्षेत्र भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सेतू म्हणून कार्य करेल : केंद्रीय मंत्री पियुष गोयल
इंडऑस ECTA च्या क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी भारत ऑस्ट्रेलियामध्ये 'इन्व्हेस्ट इंडिया' आणि 'ट्रेड प्रमोशन' कार्यालय उभारणार- गोयल
Posted On:
07 APR 2022 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2022
शिक्षण हे भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधील सेतू ठरेल असे प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केले. तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला कार्यप्रवण करण्यासाठी सक्षम करेल असेही ते म्हणाले.
“आपल्या भागीदारीतील हा महत्वाचा घटक आहे. कोविडोत्तर जगात आपल्याला संमिश्र कार्यक्रमांच्या शक्यता जोखून पहायला हव्यात”, असे गोयल यांनी सिडनीत न्यू साऊथ वेल्सच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.
भारत ऑस्ट्रेलियामधील आर्थिक सहकार्य आणि व्यापारी करार (IndAus ECTA) याला नैसर्गिक भागिदारी संबोधून पोलाद उत्पादनाची क्षमता आणि उर्जा सक्षमता तिप्पट करण्याचा भारताचा मानस आहे , असे गोयल म्हणाले.
न्यू साऊथ वेल्स विदयापीठाने आपला विस्तार भारतात करावा असे आमंत्रण देत गोयल यांनी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील भागीदारीमुळे आपल्या नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवू शकेल,असे गोयल यांनी सांगितले.
त्यानंतर व्यवसाक्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींबरोबर त्यांनी बैठक घेतली. ही बैठक ऑस्ट्रेलियाच्या व्यवसाय परिषदेने आयोजित केली होती.
इंडऑस ECTA म्हणजेच भारत ऑस्ट्रेलियामधील आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार आपल्याला येत्या पाच सहा वर्षांमध्ये द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यासाठी मदत करेल असे ते म्हणाले. 2030 या वर्षापर्यंत 100 अब्ज डॉलर्स उलाढालीच्या द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य गाठण्याची आकांक्षा आपण बाळगली पाहिजे, असेही ते म्हणाले.
इंडऑस ECTA म्हणजेच भारत ऑस्ट्रेलियामधील आर्थिक सहकार्य आणि व्यापारी कराराच्या क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी भारत ऑस्ट्रेलियात इन्व्हेस्ट इंडिया कार्यालय उभारेल आणि येत्या काही महिन्यांमध्ये ट्रेड प्रमोशन कार्यालयही सुरू करेल असे त्यांनी नमूद केले.
S.Kulkarni/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1814513)
Visitor Counter : 235