रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील ग्रीनफिल्ड महामार्गांबद्दलची अद्ययावत माहिती

Posted On: 06 APR 2022 7:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 एप्रिल 2022

 

एकूण 22 ग्रीनफिल्ड महामार्ग विकासाकरिता निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 2,485 किमी लांबीचे, 1,63,350 कोटी खर्च येणारे  5 द्रुतगती मार्ग तर 5,816 किमी लांबीचे, 1,92,876   कोटी खर्चाचे 17 नियंत्रित प्रवेशाचे महामार्ग अंतर्भूत आहेत. दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाचे  दिल्ली-दौसा-लालसोट हा 214 किमी, वडोदरा-अंकलेश्वर हा 100 किमी तर कोटा-रतलाम-झाबुआ हा 245 किमीचा महामार्ग असे तीन भाग 23 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 22 ग्रीनफिल्ड महामार्गाचा तपशील पुढीलप्रमाणे:

Sno

Corridor Name

Total

Length

(in Km)

Length in

Implementation stage

(in Km)

Completed length

(in Km)

Expressw ay

 

 

 

1

Delhi - Mumbai EXP

1,382

1,139

529

1.A

Delhi – Vadodara

845

812

425

1.B

Vadodara – Mumbai

446

267

97

1.C

Delhi - Faridabad – Sohna

90

60

8

2

Ahmedabad – Dholera

109

109

0

3

Bengaluru – Chennai

262

45

0

4

Delhi - Amritsar - Katra

669

93

0

5

Kanpur - Lucknow EXP

63

0

0

Access Controlled Highways

 

 

 

6

Ambala – Kotputli

313

313

303

7

Amritsar - Bhatinda - Jamnagar

917

762

398

7.a

Amritsar to Bhatinda

155

0

0

7.b

Sangariya to Santalpur

762

762

398

8

Raipur - Vishakhapatnam

465

57

0

9

Hyderabad Vishakhapatnam 

222

59

40

10

UER II

75

75

0

11

Chennai - Salem

277

0

0

12

Chittor Thatchur

116

0

0

13

Bangalore Ring Road

280

80

28

14

Delhi - Saharanpur - Dehradun

220

33

0

15

Durg Raipur Arang

92

0

0

16

Hyderabad - Raipur

330

0

0

17

Surat - Nashik -

Ahmednagar - Solapur

711

79

0

18

Solapur - Kurnool - Chennai

            337

39

36

19

Indore - Hyderabad

687

377

242

20

Kharagpur - Siliguri

235

0

0

21

Kota Indore (Garoth to Ujjain)

135

0

0

22

Nagpur - Vijayawada

405

95

39

  

Total

8,301

3,355

1,615

 

एकूण 8301 कि.मी. लांबीच्या महामार्गांपैकी 4,946 लांबीचे महामार्ग प्रगतीच्या विविध टप्प्यांवर आहेत. काहींचे काम दिले गेले आहे (तारीख जाहीर केलेली नाही), तर काही निविदा प्रक्रिया आणि सविस्तर प्रक्रिया अहवालाच्या टप्प्यावर आहेत.

अपघातप्रवण क्षेत्रांसाठी तात्काळ लागू होणाऱ्या कमी कालावधीच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मंत्रालयाकडे उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार सर्व अपघातप्रवण क्षेत्रांसाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तर फेब्रुवारी 2022 पर्यंत 3385 अपघातप्रवण क्षेत्रांवर दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या NHAI, NHIDCL and NH या विभागांच्या समन्वयातून सर्व अपघातप्रवण क्षेत्रांची दुरुस्ती विभागाने हाती घेतली आहे.

  1. सर्व राष्ट्रीय महामार्गांचे आरेखन, बांधकाम आणि प्रत्यक्ष काम या सर्व ट्प्प्यांवर मार्ग सुरक्षा लेखापरीक्षण केले जात आहे.
  2. राष्ट्रीय महामार्गावरील मार्ग एकत्र येण्याच्या ठिकाणी रंगपट्ट्या किंवा दिशादर्शक खुणां केल्या जात आहेत.
  3. राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यावर आवश्यक ठिकाणी वेगमर्यादेच्या खुणांची तरतूद
  4. वेगनियंत्रक आणि त्यांची सूचना देणारे फलक महामार्गांच्या बाजूच्या रस्त्यांवर लावणे.
  5. महामार्ग एकत्र येणाऱ्या जागी आयआरसीनुसार सूचनादर्शक दिवे बसवणे.
  6. उंचावरच्या किंवा डोंगराळ भागातील रस्त्यांवर वाहन कोसळण्यास प्रतिबंध करणारे बांधकाम करणे.
  7. भारतीय तंत्रज्ञान संस्था तसेच इतर आघाडीच्या तंत्रज्ञान वा संशोधन संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा लेखापरीक्षणाविषयीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.
  8. अपघातप्रवण क्षेत्राबद्दलचे MIS पोर्टल विकसित करण्यात आले आहे. ज्यात सर्व अपघातप्रवण क्षेत्रे, त्यांची ओळख, छायाचित्रे आणि दुरुस्तीचे काम कोणत्या टप्प्यावर आहे  तसेच दुरुस्तीनंतरचा अहवाल यांचे एकत्रीकरण आणि देखरेख केली जाते.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्त्तरात हा माहिती दिली.


* * *

S.Patil/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1814234)
Read this release in: English , Urdu , Tamil