ऊर्जा मंत्रालय
पाइपद्वारे वितरित होणारा नैसर्गिक वायू (पीएनजी) आणि हरित हायड्रोजनचे मिश्रण करण्यासाठी एनटीपीसीचा गुजरात गॅस लिमिटेड (जीजीएल) सोबत करार
Posted On:
05 APR 2022 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2022
स्वच्छ पर्यावरणावर निरंतर लक्ष केंद्रित करून, एनटीपीसी कावास येथे एनटीपीसीने जीजीएलच्या (गुजरात गॅस लिमिटेड) पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) नेटवर्कमध्ये हरित हायड्रोजनचे मिश्रण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. एनटीपीसी आरईएल आणि ईडी आरई एनटीपीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित भार्गव, आणि जीजीएल आणि जीएसपीएलचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या उपस्थितीत दोन्ही कंपन्यांमध्ये आज औपचारिक करार करण्यात आला.
एनटीपीसी कावसच्या विद्यमान 1 मेगावॅटच्या तरंगत्या सौर प्रकल्पातून वीज वापरून हरित हायड्रोजनची निर्मिती केली जाईल.हा हरित हायड्रोजन निर्धारित प्रमाणात पीएनजीसह मिश्रित केला जाईल आणि एनटीपीसी कावास इथल्या वसाहतींमध्ये स्वयंकपाकासाठी वापरला जाईल. सुरुवातीला, पीएनजीमध्ये हायड्रोजन मिश्रणाची टक्केवारी सुमारे 5% असेल आणि हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, ती आणखी वाढविली जाईल.
विविध इंधन मिश्रणासह 69 गिगावॅटच्या स्थापित क्षमतेसह एनटीपीसी हे देशातील प्रमुख ऊर्जा उत्पादक महामंडळ आहे. एका दशकात 60 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करण्याची योजना एनटीपीसी समूहाने आखली आहे आणि हरित हायड्रोजन क्षेत्रामध्ये अनेक पथदर्शी प्रकल्प राबवत आहे.
जीजीएल ही भारतातील सर्वात मोठी शहरी गॅस वितरण (सीजीडी ) कंपनी आहे आणि 6 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 43 जिल्ह्यांमध्ये तिचे अस्तित्व आहे.एनटीपीसी कावस येथील हा हायड्रोजन मिश्रण प्रकल्प एक पहिलाच प्रयत्न असून देशातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. स्वयंपाक क्षेत्रामधील कार्बन उत्सर्जन शून्य करण्याच्या आणि आणि देशाच्या ऊर्जेच्या गरजांच्या पूर्ततेच्या दृष्टीने आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1813896)
Visitor Counter : 259