नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशात एकूण 40,000 मेगावॅट क्षमतेचे 50 सौर पार्क उभारण्यासाठी सरकारकडून योजनेची अंमलबजावणी

Posted On: 05 APR 2022 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2022

 

देशात एकूण 40,000 मेगावॅट क्षमतेचे 50 सौर पार्क उभारण्यासाठी सरकार  योजना राबवत आहे.सौर ऊर्जा प्रकल्पांची स्थापना सुलभ करण्याच्या दृष्टीने विकसित पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी हे पार्क आहेत. सविस्तर  प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 25 लाखांपर्यंत आणि प्रति मेगावॅट 20 लाख रुपये किंवा प्रकल्प खर्चाच्या 30% केंद्रीय आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. जिथे कमतरता असेल तिथे असे पार्क  विकसित करण्यासाठी हे सहाय्य देण्यात येते.

केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती  दिली.


* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1813884) Visitor Counter : 195


Read this release in: English , Urdu