संरक्षण मंत्रालय

वाईस ऍडमिरल अजय कोच्चर, एव्हीएसएम, एनएम यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला

Posted On: 01 APR 2022 10:02PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख म्हणून वाईस ऍडमिरल अजय कोच्चर,एव्हीएसएम, एनएम यांनी 1 एप्रिल 2022 रोजी एयर मार्शल संजीव कपूर एव्हीएसएम, व्हीएम यांच्याकडून कार्यभार स्वीकारला.

वाईस ऍडमिरल अजय कोच्चर स्वतः राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून 1 जुलै 1988 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत ते रुजू झाले. वेलिंग्टनचे डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज, मुंबईचे नेव्हल वॉर कॉलेज आणि युकेमधील रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्सचे ते पदवीधर आहेत. या ध्वज अधिकाऱ्याने आपल्या 34 वर्षांच्या सेवेदरम्यान विविध महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. असा अनुभवी अधिकारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या सर्वोच्च पदावर असल्याने  त्यांच्या विस्तृत अनुभवाचा आणि कामाचा लाभ प्रबोधिनीला होणार आहे.

***

S.Kakade/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1812594) Visitor Counter : 221


Read this release in: English , Urdu , Hindi