रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ता अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी एनएचएआयचे नियोजन सुरू
Posted On:
31 MAR 2022 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2022
दिल्ली-मुंबई/मुंबई-चेन्नई/चेन्नई-कोलकाता/कोलकाता-आग्रा आणि आग्रा-दिल्ली कॉरिडॉर ऑफ गोल्डन क्वाड्रिलॅटरल (NH) दरम्यान विशिष्ट राष्ट्रीय महामार्ग पट्ट्यात चालक, प्रवासी, पादचारी/सायकलस्वारांसह रस्ते अपघातात जखमी झालेल्याना कॅशलेस उपचार सुविधा मिळवून देण्यासाठी एक योजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आखत आहे.राष्ट्रीय महामार्गावरील(NH) रस्ता अपघातात झालेल्यांना, नियंत्रण कक्षात नोंदवल्याप्रमाणे रुग्णवाहिका अपघात स्थळी पोहोचल्यापासून, ते अपघातग्रस्त रूग्णालयात दाखल होण्याच्या वेळेपासून किंवा आवश्यक उपचार प्रदान करण्याच्या पहिल्या 48 तासांच्या आत अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करून घेणे यापैकी जे आधी घडेल, त्यासाठीच्या 30,000/ रुपयांपर्यंतच्या तात्काळ गरजा यामुळे पूर्ण केल्या जातील.
निविदा प्रक्रियेच्या समाप्तीनंतर आणि निवडलेल्या विमा कंपनीच्या ऑन-बोर्डिंगनंतर, ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणली जाईल, आणि त्यानंतरच योजनेच्या यशाचे मूल्यांकन करता येईल.
दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई, चेन्नई-कोलकाता आणि कोलकाता-दिल्ली या सुवर्ण चतुष्पादाच्या चारही मार्गांवर कॅशलेस उपचार सुविधेसाठी ईर्डा(IRDAI) कडे ज्या कंपन्या नोंदणीकृत आहेत किंवा मागील 5 वर्षांपासून केंद्रीय कायद्याद्वारे विमा काढण्यासाठी सक्षम अशा विमा कंपन्यांकडून ज्यांचे मागील 3 वर्षांतील दावे निकाली काढण्याचे प्रमाण प्रमाण किमान 85% आहे त्यांच्याकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.
या योजनेची प्रायोगिक अंमलबजावणी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे, ही योजना इतर राष्ट्रीय महामार्गांवर देखील विस्तारली जाऊ शकते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Kulkarni/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1811925)