संरक्षण मंत्रालय

देशातील 37 छावणी रुग्णालयांमध्ये 1 मे 2022 पासून आयुर्वेदिक उपचार केंद्रे सुरु होणार

Posted On: 30 MAR 2022 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 31 मार्च 2022


पारंपारिक भारतीय आयुर्वेदिक औषधउपचार पद्धतीचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळवून देण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने 1 मे 2022 पासून देशभरातील 37 छावणी रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार केंद्रे कार्यान्वित  करण्याचा निर्णय घेतला आहे.


संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार आणि केंद्रीय आयुष मंत्रालय सचिव वैद्य राकेश कोटेचा यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे संरक्षण दलांतील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच छावणी परिसरातील निवासी यांच्यासह छावणी रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा लाभ घेणाऱ्या इतर सामान्य नागरिकांना आयुर्वेदातील प्रस्थापित आणि काळाच्या कसोटीवर सिध्द झालेल्या उपचार पद्धती उपलब्ध होणार आहेत.


या उपक्रमाला आयुष मंत्रालय पाठबळ पुरविणार असून  या 37 रुग्णालयांसाठी कुशल आयुष डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट यांची नेमणूक केली जाणार आहे. या 37 आयुर्वेदिक उपचार केद्रांमध्ये प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी संरक्षण मालमत्ता महासंचालनालय, संरक्षण मंत्रालय आणि केंद्रीय आयुष मंत्रालय एकमेकांच्या सहकार्याने समन्वय साधून आवश्यक कार्य करतील असा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.


या निर्णयाचा लाभ महाराष्ट्राला देखील होणार असून राज्यातील खडकी तसेच देहूरोड या दोन छावणी रुग्णालयांमध्ये सुरु होणाऱ्या आयुर्वेदिक उपचार केंद्रांचा या 37 केंद्रांमध्ये समावेश आहे.


देशभरातील ज्या छावणी रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार केंद्रे सुरु होणार आहेत त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

 

List of 37 Cantonment Board Hospitals to operationalise Ayurveda Centres

1

Agra

2

Allahabad

3

Bareilly

4

Dehradun

5

Mhow

6

Pachmarhi

7

Shahjahanpur

8

Jabalpur

9

Badami Bagh

10

Barrackpore

11

Ahmedabad

12

Dehuroad

13

Khadki

14

Secunderabad

15

Dagshai

16

Ferozepur

17

Jalandhar

18

Jammu

19

Jutogh

20

Kasauli

21

Khasyol

22

Subathu

23

Jhansi

24

Babina

25

Roorkee

26

Danapur

27

Kamptee

28

Ranikhet

29

Lansdowne

30

Ramgarh

31

Mathura

32

Belgaum

33

Morar

34

Wellington

35

Amritsar

36

Bakloh

37

Dalhousie

 

***

MA/SK/CY

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1811773) Visitor Counter : 265


Read this release in: English , Hindi , Urdu