अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

अवकाश विभागाने, विविध खाजगी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणाद्वारे सुमारे 35 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आणि 10 दशलक्ष युरो इतका महसूल गेल्या तीन वर्षात मिळवला- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह


भारताने इस्रोच्या पीएसएलव्ही वरुन गेल्या तीन वर्षात, 45 आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे उपग्रह अवकाशात पाठवले- डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 30 MAR 2022 9:34PM by PIB Mumbai

 

अवकाश विभागाच्या अंतर्गत असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडया सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने, गेल्या तीन वर्षात म्हणजेच 2019- 2021 या काळात, 35 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आणि 10 दशलक्ष युरो इतका महसूल मिळवला आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि अवकाश विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली. अवकाश विभागाने, विविध खाजगी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे उपग्रह अवकाशात सोडून हा महसूल मिळवला आहे.

एनएसआयएल ने गेल्या तीन वर्षातइस्रोच्या पीएसएलव्ही वरुन 45 आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले आहे आणि परदेशी उपग्रह ग्राहकांशी एनएसआयएल ने चार समर्पित उड्डाण सेवा करार देखील केले आहेत, अशी माहिती डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.

जागतिक ब्रॉडबॅड दूरसंवादाची आवश्यकता वाढते आहे, त्यामुळे, इस्रोच्या एसएसएलव्ही, पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही -एमके-III, अशा उपग्रह प्रक्षेपकांवरुन आणखी अनेक परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण भविष्यात करता येईल, अशी एनएआयएल ला अपेक्षा आहे. दळणवळण उपग्रह आणि पृथ्वी निरीक्षण व्यवस्था यातील इस्रोच्या कौशल्याची माहिती, संपूर्ण जगाला कळावी, या उद्देशाने, एनएसआयएल विविध आंतरराष्ट्रीय परिषदा आणि प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवत असते. ज्याद्वारे प्रक्षेपण सुविधा आणि संपूर्ण अभियानात सहकार्य दिले जाते. यात परदेशी ग्राहकांना प्रक्षेपणासाठी तळावर लागणाऱ्या साहित्याची देखील व्यवस्था केली जाते, जेणेकरुन भारताला अधिकाधिक परदेशी महसूल मिळू शकेल.

केंद्र सरकारने अवकाश क्षेत्र सुधारणा आणि इन-स्पेस (IN-SPACe)  या स्वायत्त संस्थेची स्थापना करुन भारताचे अवकाश क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले केले आहे, अशी माहिती डॉ सिंह यांनी दिली.ही संस्था, खाजगी क्षेत्रातील अवकाश संबंधी उपक्रमांचे नियमन आणि प्रोत्साहन देण्याचे काम करत असते.

इन- स्पेस संस्थेला आतापर्यंत या उपक्रमांसाठी, 48 अर्ज मिळाले असून, पुढील कार्यवाहीसाठी त्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यापैकी, खाजगी संस्थांचे अवकाश विषयक उपक्रमांना मंजुरी देण्यासाठीचे 16 अर्ज, तंत्रज्ञान आणि सुविधा देण्याची विनंती करणारे 23 अर्ज आणि, सल्ला तसेच प्रोत्साहन विषयक सेवांची मागणी करणारे 9 अर्ज आहेत.  सर्व अर्ज, मंजुरी प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1811701) Visitor Counter : 224


Read this release in: English , Urdu , Tamil