महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सक्षम अंगणवाड्या आणि पोषण 2.0 योजनेसाठी निधीचे वाटप

प्रविष्टि तिथि: 30 MAR 2022 6:22PM by PIB Mumbai

 

आर्थिक वर्ष 2021-22 च्या सुधारित अर्थसंकल्पीय वाटपानुसार 'सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 या योजनेसाठी 19999.55 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून हा निधी ,आर्थिक वर्ष 2020-21 च्या 17902.31 कोटी रुपये या

सुधारित अर्थसंकल्पीय वाटपापेक्षा 11.71% अधिक आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे आयोजित राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) अंतर्गत 5 वर्षांखालील कमी वजनाच्या, अपोषित आणि गंभीरपणे कुपोषित असलेल्या मुलांची अंदाजे संख्या सर्वेक्षण करून प्राप्त केली जाते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या  NFHS-5

अलीकडील (2019-21)अहवालानुसार, (2015-16) या वर्षाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या तुलनेत 5 वर्षाखालील मुलांचे पोषण निर्देशांक सुधारले आहेत.  मुलांचे  वाढ खुंटण्याचे प्रमाण 38.4% वरून 35.5% पर्यंत कमी झाले आहे, तर कुपोषित होण्याचे प्रमाण 21.0% वरून 19.3% आले आहे आणि वजन कमी असण्याचे प्रमाण 35.8% वरून 32.1% पर्यंत कमी झाले आहे.

ही माहिती केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी  यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

***

S.Patil/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1811589) आगंतुक पटल : 193
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Gujarati