निती आयोग
नीती आयोग, येत्या 30 मार्च रोजी कार्बनचा सक्षम वापर, उपयोग आणि साठवण यावर एक कार्यशाळा करणार आयोजित
Posted On:
28 MAR 2022 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2022
नीती आयोगाच्या वतीने,कार्बनचा सक्षमपणे वापर, उपयोग आणि साठवण (CCUS) या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील एक कार्यशाळेचे आयोजन दिनांक 30 मार्च 2022 रोजी, करण्यात येत आहे.
या कार्यशाळेचे उदघाटन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार,यांच्या हस्ते होणार असून सदस्य डॉ. व्हीके सारस्वत आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, पंतप्रधानांचे सल्लागार अमित खरे, प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. के विजय राघवन, भारत सरकारचे सर्व सचिव, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित असतील.
आपले हवामान लक्ष्य साध्य करण्यात सीसीयूची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे नीती आयोगाने ओळखले आहे. अलीकडेच, हवामान बदलावरील आंतर-सरकारी समूहाने केलेल्या अभ्यासाने आपल्या अर्थव्यवस्थेचे डी-कार्बनीकरण करण्यासाठी कार्बन कॅप्चरचे असलेले महत्त्व दाखवून दिले आहे. औद्योगिक उत्सर्जनासाठी हे आज विशेषतः महत्वाचे आहे, ज्याकडे आवश्यक लक्ष दिले गेलेले नाही. वातावरणातील निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन, कदाचित आजच्या तेल उद्योगाइतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या उद्योगापेक्षा दुप्पट मोठा एखादा नवीन उद्योग तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. शून्य कार्बन अर्थव्यवस्थेमध्ये तात्काळ संक्रमण करण्यासाठी सीसीयूएस एक महत्त्वपूर्ण परीवर्तन ठरेल आणि त्यानुसार, सरकारला 2070 उद्दिष्टाची वचनबद्धता दाखवणे आवश्यक होईल.
भारतात चक्राकार अर्थव्यवस्था सक्षम करण्यात सीसीयूच्या असलेल्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी सरकारी अधिकारी, संबंधित उद्योगक्षेत्रातील धुरीण आणि शैक्षणिक संघटना निती आयोगाच्या या कार्यशाळेत एकत्र येतील.
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810627)
Visitor Counter : 231