संरक्षण मंत्रालय

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी 21 नव्या सैनिकी शाळा भागीदारीच्या तत्वावर सुरु करण्यास संरक्षण मंत्रालयाची मंजूरी

Posted On: 26 MAR 2022 5:03PM by PIB Mumbai

 

देशात, स्वयंसेवी संस्था /खाजगी संस्था/ राज्य सरकारे यांच्यासोबत भागीदारी करुन या शैक्षणिक वर्षात, 21 नव्या सैनिकी शाळा सुरु करण्यास, संरक्षण मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारच्या  देशभरात, भागीदारीच्या तत्वावर 100 शाळा सुरु करण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून या शाळा स्थापन केल्या जाणार आहेत. या शाळा सध्या असलेल्या सैनिकी शाळांपेक्षा वेगळ्या असतील.

मंजूरी देण्यात आलेल्या 21 सैनिकी शाळांची राज्ये/केंद्रशासित प्रदेश निहाय यादी सोबत जोडली असून, www.sainikschool.ncog.gov.in. या संकेतस्थळावर देखील ती बघता येईल. सध्या अस्तित्वात असलेल्या सैनिकी शाळा, पूर्णपणे निवासी शाळा आहेत. मात्र, या नव्या 21 शाळांपैकी 7 शाळा दिवसभराच्या असतील तर 14 शाळा निवासी शाळा असतील.

या नव्या शाळा, त्यांच्या संबंधित शैक्षणिक बोर्डाशी संलग्न असतील, त्याशिवाय, त्या सैनिक स्कूल सोसायटीच्या अधीन राहून काम करतील. या सोसायटीने भागीदारीतल्या सैनिकी शाळांसाठी निश्चित केलेल्या नियम-कायद्यांच्या अनुसार त्यांचे कार्यान्वयन चालेल. या शाळेची कार्यपद्धती आणि इतर माहिती www.sainikschool.ncog.gov.in. वर उपलब्ध आहे.

प्रवेश प्रक्रिया:

(A) या सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया सहाव्या इयत्तेपासून सुरु होणार असून, त्यासाठी खालील नियम असतील:-

  1. एनटीए ने ई कौन्सिलिंग च्या माध्यमातून घेतलेल्या प्रवेश परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सहाव्या वर्गात 40 टक्के जागा असतील.
  2. त्याच शाळेत आधी शिकत असलेल्या आणि आता सैनिकी शाळेत शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 60 टक्क्यांपर्यंतच्या जागा ठेवल्या जातील. मात्र, त्यांनाही एक पात्रता चाचणी द्यावी लागेल, ज्यासाठीची वेगळी अधिसूचना लवकरच जारी केली जाईल.

(B) अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा-2022 साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्याविषयी त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी वर एनटीए कडून कळवले जाईल. यात. नव्याने मंजूर झालेल्या सैनिकी शाळा केव्हा सुरु होतील  आणि शाळेत अर्ज करण्याची प्रक्रिया याविषयी माहिती दिली जाईल. जे पात्र विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या शाळेत प्रवेश घेण्यास उत्सुक असतील, त्यांना ई-कौन्सिलिंग साठी www.sainikschool.ncog.gov.in.  इथे नोंदणी करावी लागेल.

(C) ज्या विद्यार्थ्यांनी नव्या सैनिकी शाळांमध्ये आधीच नोंदणी केली असेल आणि त्यांना पुढेही याच शाळेत, सैनिकी विभागात काम करण्याची  इच्छा असेल, त्यांना लवकरच होणाऱ्या पात्रता परीक्षेच्या आधारावर प्रवेश दिले जातील. नव्या सैनिकी शाळांना अशा इच्छुक विद्यार्थ्यांची वेगळी यादी निश्चित वेळेत पात्रता चाचणी घेणाऱ्या संस्थेला पाठवण्याची सूचना या सैनिकी शाळांना देण्यात आली आही याविषयीची सविस्तर माहिती देखील, www.sainikschool.ncog.gov.in. या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे.

मान्यता मिळालेल्या नव्या सैनिकी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया मे 2022 पासून सुरु होण्याची शक्यता आहे. याविषयीचे वेळापत्रक www.sainikschool.ncog.gov.in. या वेब पोर्टलवर बघता येईल.

दुसऱ्या फेरीत उर्वरित सैनिकी शाळांसाठी इच्छुक असल्याचे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया एप्रिल 2022 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे.

Annexure

LIST OF APPROVED NEW SAINIK SCHOOLS

S.N.

STATE

DISTRICT

NAME OF SCHOOL

1

ANDHRA PRADESH

Y.S.R. KADAPA

POOJA INTERNATIONAL SCHOOL

2

ARUNACHAL PRADESH

TAWANG

TAWANG PUBLIC SCHOOL

3

ASSAM

CACHAR

DIRECTORATE OF SECONDARY EDUCATION ASSAM

4

BIHAR

SAMASTIPUR

SUNDARI DEVI SARASWATI VIDYA MANDIR

5

CHHATTISGARH

RAIPUR

N H GOEL WORLD SCHOOL

6

DADRA AND NAGAR HAVELI

DADRA AND NAGAR HAVELI

VIDYA BHARATI GUJARAT PRADESH
(NETAJI SUBHAS CHANDRA BOSE MILITARY ACADEMY)

7

GUJARAT

JUNAGADH

BRAHMCHARI SHRI BHAGAVATINANDJI EDUCATION TRUST
(SHRI BHRAMANAND VIDYA MANDIR)

8

HARYANA

FATEHABAD

OM VISHNU EDUCATION SOCIETY
(ROYAL INTERNATION RESIDENTIAL SCHOOL)

9

HIMACHAL PRADESH

SOLAN

RAJ LUXMI SAMVID GURUKULAM

10

KARNATAKA

BELAGAVI

SANGOLLI RAYANNA SAINIK SCHOOL

11

KERALA

ERNAKULAM

SREE SARADA VIDYALAYA

12

MADHYA PRADESH

MANDSAUR

SARASWATI VIDHYA MANDIR HIGHER SECONDARY SCHOOL

13

MAHARASHTRA

AHMEDNAGAR

PD DR V VIKHE PATIL SAINIK SCHOOL

14

NAGALAND

DIMAPUR

LIVINGSTONE FOUNDATION INTERNATIONAL

15

ODISHA

DHENKANAL

SANSKAR PUBLIC SCHOOL (ABAKASH FOUNDATION)

16

PUNJAB

PATIALA

DAYANAND PUBLIC SCHOOL SILVER CITY NABHA

17

RAJASTHAN

GANGANAGAR

BHARTI CHARITABLE TRUST
(BLOOMING DALES INTERNATIONAL SCHOOL)

18

TAMIL NADU

TUTICORIN

THE VIKASA SCHOOL

19

TELANGANA

KARIMNAGAR

TELANGANA SOCIAL WELFARE RESIDENTIAL SAINIK SCHOOL

20

UTTAR PRADESH

ETAWAH

VIKAS LOK SEVA SAMITI
(MOUNT LITTERA ZEE SCHOOL)

21

UTTARAKHAND

DEHRADUN

GRD WORLD SCHOOL BHAUWALA

 

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1809999) Visitor Counter : 1108