पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचे शपथ ग्रहण केल्याबद्दल अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
25 MAR 2022 7:03PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचे पदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
गेल्या पाच वर्षातील त्यांच्या उत्तम कामगिरीचे स्मरण पंतप्रधानांनी केले, आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या नवा अध्यायाला आरंभ करेल, असा विश्वास व्यक्त केला.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले,
“उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल @myogiadityanath जी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला हार्दिक शुभेच्छा. गेल्या पाच वर्षात राज्याच्या विकासाच्या प्रवासाने अनेक महत्त्वाचे टप्पे सर केले आहेत. तुमच्या नेतृत्वाखाली जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करताना हे राज्य प्रगतीचा आणखी एक नवा अध्याय लिहील, असा मला विश्वास आहे.”
***
S.Patil/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1809854)
आगंतुक पटल : 274
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam