संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलासाठी दोन बहुपयोगी नौका खरेदी करण्याबाबत मुंबईतील लार्सन अँड टूब्रो लिमिटेडशी करार

Posted On: 25 MAR 2022 8:30PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलासाठी दोन बहुउपयोगी नौका विकत घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने मुंबईतील मेसर्स लार्सन अँड टूब्रो लिमिटेडशी (एल अँड टी) आजम्हणजेच 25 मार्च 2022 रोजी एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदी करण्याच्या तत्वानुसार,887 कोटी रुपयांना या नौका एल अँड टी कडून खरेदी केल्या जाणार आहेत. नौदलाचे उपप्रमुख व्हाईस अॅडमिरल एस.एन घोरमाडे आणि अतिरिक्त सचिव आणि सामान्य हस्तांतरण विभागाचे संचालक, पंकज अग्रवाल यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या नौका, मे 2025 मध्ये मिळणे अपेक्षित आहे.

भारतीय नौदलाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी, या बहुपयोगी नौका उपयुक्त ठरणार असून, अगदी परवडणाऱ्या दरात, ही नौका नौदलाला मिळणार आहेत. या नौकांचे बांधकाम, चेन्नईतील कट्टूपल्ली इथल्या मेसर्स एल अँड टी जहाजबांधणी कारखान्यात केले जाणार आहे. नौदलाला, सागरी टेहळणी आणि गस्त, टॉरपिडो सोडण्यासाठी, ते ठेवण्यासाठी, तसेच विविध हवाई, जमिनीवरील आणि पाण्याखालील कारवाया करण्यासाठी या जहाजांचा उपयोग होईल. मोठ्या नौका ओढून नेण्यासाठी तसेच, मर्यादित नौका रुग्णालय क्षमतेसह आपत्ती व्यवस्थापन कार्यात मानवतेच्या दृष्टीने मदत कार्यात या नौका सहकार्य करु शकतील. नौदलाच्या शस्त्रास्त्रासाठी तसेच सेन्सर व्यवस्थेच्या चाचण्या घेण्यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून या नौका उपयोगी ठरतील. आयएसव्ही आणि अपघातप्रसंगी बचावमोहमेत मदत तसेच बेटावरील प्रदेशांना लॉजिस्टीक मदत करण्यासही या नौकांचा वापर करता येईल.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1809850) Visitor Counter : 221


Read this release in: English , Urdu , Hindi