पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

परदेशी प्रजातींच्या आक्रमणामुळे होणारे जैवविविधतेचे नुकसान रोखणे

Posted On: 24 MAR 2022 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मार्च 2022

 

आक्रमक परदेशी प्रजातींच्या डेटाबेसची माहिती केंद्र सरकार नियमितपणे अद्ययावत करते. भारतीय प्राणीविज्ञान  सर्वेक्षण (ZSI) कडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रजातींच्या समुदायातील एकूण 154 प्रजाती ज्यात जमिनीवरील आणि गोड्या पाण्यातील 56 प्रजाती आणि सागरी परिसंस्थेच्या 98 प्रजाती विदेशी/आक्रमक प्रजाती म्हणून नोंद करण्यात आली आहे.

आक्रमक प्रजातींचे पुनरुत्पादन आणि प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या कृती आराखड्यात विमानतळ आणि  बंदरावर विलगीकरण सुविधेला बळकटी, नीरीम (बॅलास्ट) जलाच्या विल्हेवाटीसाठी आयएमओ (आंतरराष्ट्रीय सागरी संघटना) नियमांचे काटेकोर पालन; विदेशी प्रजातींवरील प्रभावाचे मूल्यांकन यांचा समावेश आहे.  तसेच यामध्ये व्यावसायिक उपक्रमासाठी विदेशी प्रजातींचे नियमन, वाढीचा दर, पुनरुत्पादन यश, विखुरण्याची क्षमता आणि  बदलत्या हवामानादरम्यान विदेशी प्रजातींची सहनशीलता, विदेशी/आक्रमक प्रजातींवरील स्थिती सर्वेक्षणाचे मूल्यांकन अंतर्भूत आहे. आक्रमक परदेशी प्रजातींच्या  संवर्धनासाठी कुठलाही परवाना जारी केला जात नाही आणि या मंत्रालयामध्ये अशी कोणतीही माहिती एकत्रित केलेली नाही.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1809342)
Read this release in: English , Urdu