कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी आणि शेतकरी कल्याण विषयक संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन


किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी समितीने केली चर्चा

Posted On: 24 MAR 2022 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मार्च 2022

 

दिनांक 23 मार्च, 2022 रोजी कृषी आणि शेतकरी कल्याणावरील संसदीय सल्लागार समितीची बैठक झाली. त्यात किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या सुधारणेसाठी आणि चांगल्या अंमलबजावणीसाठी समितीने विविध पैलूंवर चर्चा केली.

समितीला संबोधित करताना, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की सरकार उर्वरित सर्व लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा म्हणून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यासाठी मोहीम राबवत आहे. ते म्हणाले की, प्रक्रिया शुल्क, तपासणी शुल्क, खातेवही, फोलिओ शुल्क यासारख्या अल्पमुदतीच्या कर्जावरील 3 लाख रुपयांपर्यंतचे सर्व प्रशासकीय शुल्क माफ करण्यात आले आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेद्वारे स्वस्त दरात कर्ज मिळू शकेल.

मंत्र्यांनी समिती सदस्यांना असेही सांगितले की किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज सुलभ करण्यात आला आहे आणि संपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून 14 दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्ड जारी करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना सवलतीच्या कर्जाची उपलब्धता करण्याच्या दिशेने बँका आणि इतर हितधारकांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांच्या परिणामी, 4 मार्च 2022 पर्यंत 3.22 लाख कोटी रुपयांच्या मंजूर पत मर्यादेत सुमारे 2.94 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत लाभ देऊन मैलाचा टप्पा गाठला आहे असेही मंत्र्यांनी सांगितले.

समिती सदस्यांनी आपल्या समस्या मांडल्या व योजनेत आणखी सुधारणा करण्यास सुचवले. तोमर यांनी समिती सदस्यांचे त्यांच्या बहुमूल्य सूचनांबद्दल आभार मानले आणि त्यांना आश्वासन दिले की मंत्रालय प्रत्येक सूचनेकडे लक्ष देईल आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनुकूल उपाय काढेल. सदस्यांना त्यांच्या संबंधित मतदारसंघातील शेतकरी समुदायामध्ये किसान क्रेडिट कार्ड विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती त्यांनी केली.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1809328) अभ्यागत कक्ष : 314