PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 22 MAR 2022 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 22 मार्च 2022

  • 181.56 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 23,913
  • Active cases stand at 0.06%
  • Recovery Rate currently at 98.74%
  • 2,741 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,24,70,515
  • 1,581 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.28%)
  • Weekly Positivity Rate (0.39%)
  • 78.36 cr Total Tests conducted so far; 5,68,471 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCorona

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 181.56 (1,81,56,01,944) कोटी  लसींच्या मात्रांचा  टप्पा पार केला आहे.  2,14,38,677 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत  34 लाखापेक्षा जास्त (34,19,633) कोविड प्रतिबंधक लसमात्रा दिल्या आहेत.

देशात कोविड रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. सध्या ती 23,913 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या  आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.06% इतकी आहे.

परिणामी, देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे.

गेल्या 24 तासांत 2,741 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,24,70,515 झाली आहे.

गेल्या 24 तासात देशभरात 1,581 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 5,68,471  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 78.36 (78,36,13,628) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.39% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.28% आहे.

इतर अपडेट्स :

 

 

R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1808339) अभ्यागत कक्ष : 162