रसायन आणि खते मंत्रालय
खतांवरील अनुदान
Posted On:
22 MAR 2022 5:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2022
शेतकऱ्यांना युरिया खत, वैधानिकदृष्ट्या अधिसूचित केलेल्या अधिकतम किरकोळ किमतीला दिले जाते. 45 किलोच्या युरियाच्या पोत्याची किंमत 242 रुपये इतकी आहे. (कडुलिंबाच्या आवरणाचे शुल्क आणि कर वगळता). युरियाची बाजारातील किंमत आणि शेतकऱ्यांना मिळणारा दर यातील तफावत भरुन काढण्यासाठी सरकारतर्फे अनुदानाची रक्कम युरिया उत्पादक/आयातकांना दिली जाते. म्हणजेच, सर्व शेतकऱ्यांना ( छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना)अनुदानित दरात युरियाचा पुरवठा केला जातो.
त्याशिवाय, केंद्र सरकारने, फॉसफेटिक आणि पोटाश या खतांसाठी पोषकमूल्य आधारित अनुदान धोरण देखील 1 एप्रिल 2010 पासून लागू केले आहे. हे अनूदान वार्षिक आधारावर तसेच, या दोन्ही खतांमधील पोषक मूल्यांच्या प्रमाणानुसार दिले जाते. या धोरणाअंतर्गत, खत कंपन्यांनी बाजारातील स्थितिनुसार निश्चित केलेल्या एमआरपीवर केंद्र सरकारची देखरेख असते. म्हणजेच, ही खते विकत घेणाऱ्या शेतकऱ्याला, सरकारच्या अनुदानाचा लाभ मिळतो.
कृषी विकास आणि ग्रामीण परिवर्तन केंद्र, (ADRTC), बंगरुळू, यांनी तयार केलेल्या अहवलानुसार, कडुलिंबाचे आवरण असलेल्या युरियामुळे खालील बदल झाले:
(i)मातीच्या गुणवत्तेत सुधारणा,
(ii)कीटकनाशकांच्या आणि रोगनिवारक तसेच तणनाशकांच्या वापरात घट, पर्यायाने खर्चाची बचत.
(iii)पिकांच्या उत्पादनात आणि त्यापासून मिळणाऱ्या उपपैदास यांच्यात सुधारणा
(iv)तूरीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ, त्या खालोखाल ऊस, सोयाबीन, धान, ताग अनाई मक्याच्या उत्पादनात वाढ.
(v)पूर्वी सामान्य युरियाचा खतांशिवाय इतर ठिकाणी वापर केला जात असे, आता कडुलिंबाच्या आवरणामुळे मात्र हे पूर्णपणे थांबले आहे.
केंद्रीय खते आणि रसायने राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.
R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808262)
अभ्यागत कक्ष : 276